शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात होतेय ग्राहकांची फसवणूक

By admin | Updated: August 22, 2016 01:13 IST

आठवडीबाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली, तर नकळत आपली विक्रेत्याकडून अगदी जादूई पद्धतीने फसवणूक केली जाते.

दगड, आलू, कांद्यांचा वापर : वजनेच झाली गायब, ‘दांडी’ मारण्याचे प्रमाण वाढलेमारेगाव : आठवडीबाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली, तर नकळत आपली विक्रेत्याकडून अगदी जादूई पद्धतीने फसवणूक केली जाते. या भावबाजीतून ग्राहकाला क्षणभरच पैसे बचतीचा आनंद मिळतो. मात्र अशा भावबाजीच्या खरेदीतून आपलीच फसगत होते. कारण आठवडीबाजारात सर्रास ‘दांडी’ मारण्याचा प्रकार चालतो. वजन मापात सर्रास दगड, कांदे, आलू आदींचा वापर होत असल्याने ग्राहकाला या फसगतीबद्दल काहीच कळत नाही.जिल्ह्यात सर्वत्र आठवडीबाजारात हीच परिस्थिती आहे. आठडीबाजारात किरकोळ व्यापारी लांबवरून जातात. या विक्रेत्यांना त्यांच्याजवळील वजन मापे दर दोन वर्षांनी एकदा प्रमाणित करावे लागते. तसा शासनाचा नियम आहे. मात्र आठवडीबाजारात जाणारे अनेक छोटे व्यापारी वजन मापे नियमाप्रमाणे दर दोन वर्षांनी प्रमाणितच करीत नाही. विशेष म्हणजे संबंधित वजन मापे विभागाकडून त्यांची साधी कधी चौकशीही होत नाही. त्यामुळे ते आता खूपच निर्ढावलेले आहेत. ते सर्रास त्यांच्याजवळील वस्तू मोजण्यासाठी खुलेआमपणे दगड, बटाटे, कांदे आदींचा वापर करताना आढळून येत आहे. एखादवेळी वजन व मापे विभागाचे कुणी अधिकारी, कर्मचारी आलेच, तर ते अशा विक्रेत्यांशी ‘अर्थपूर्ण’ बोलणी करून वेळ निभावून नेतात. परिणामी या कायद्याची सर्रास पायमल्ली सुरू आहे.अनेक किरकोळ व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून तीच ती वजन व मापे वापरत असतात. त्यामुळे ती अत्यंत जीर्ण होतात. त्या वजन व मापाची झीज होऊन त्याचे वजनही आपोआप काही वर्षांनी कमी होते. त्याच वजन व मापांनी तोलून ग्राहकांना एखादी वस्तू देण्यात येते. परिणामी कमी वजनाची व मापाची वस्तू वस्तू ग्राहकांच्या माथी मारली जाते. त्यामुळे ग्राहकाने एक किलो वस्तूची किंमत विक्रेत्याला दिली, तरी त्या वस्तूचे वजन अनेकदा एक किलोपेक्षा किती तरी कमीच असते.आठबाजारातील काही विक्रेते तर ‘दांडी’ मारण्यात चांगलेच पटाईत झाले आहेत. अनेकदा त्यांच्याजवळ प्रमाणित केलेले वजन, तर सोडाच दुसरेही पर्यायी वजन व माप नसते. ते सर्रास वस्तूंच्या मोजमापासाठी आलू, कांदे, दगडांचा वापर करून ग्राहकांच्या खिशाला चुना लावतात. वस्तू तोलाईत ते प्रचंड सफाईने ‘हातसफाई’ही करतात. ती तर या विक्रेत्यांची मोठी कला असते. प्रमाणित तराजूला एक खास दांडी लावून हातसफाई केली जाते. कोणत्याही वस्तूचे वजन करताना ग्राहकांचे लक्ष पारड्यावर असते. हीच संधी साधून वजन करणारा विक्रेता ज्या पारड्यात वस्तू ठेवतो, त्या बाजूला पारडे झुकवून कमी वजनाची वस्तू ग्राहकाच्या माथी मारतो. ग्राहकांचे लक्ष नाही, हे बघताच तराजूची दांडी वरील बाजूला लटकवून अलगदपणे तो कमी वजनाची वस्तू ग्राहकाला देतो.आठबाजारातील विक्रेते अशा अनेक ‘टॅक्ट’ वापरून वजनात प्रचंड हेराफेरी करतात. बाजारात ‘डुप्लीकेट’ वजन मापेही मिळत असून त्या वजनावर एक किलो असे नमूद असते. प्रत्यक्षात त्याचे वजन ८०० ग्रॅमच असते. अशा वजनांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्याचा संशय बळावला आहे. अनेकदा दुकानातील वस्तूपेक्षा आठवडी बाजारातील वस्तू स्वस्त असण्याचे हे एक कारण असते. आठवडीबाजारात ग्राहक भावबाजी जास्त करतो. त्यामुळे विक्रेते स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी या मार्गांचा अवलंब करतात. (शहर प्रतिनिधी)वजन मापे विभागाकडून कारवाई शून्यआठबाजारात ग्राहकांची सर्रास लूट होत असते. मात्र वजन व मापे विभागाकडून अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी कधी आठवडी बाजारात वजन तपासण्यासाठी आल्याचे दिसतही नाहीत. एखाद्या जागरूक ग्राहकाने वजन मापाबद्दल विक्रेत्याला हटकल्यास, विक्रेतेच त्यांच्याशी हुज्जत घालतात. त्यामुळे ग्राहक नसती भानगड नको म्हणून अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात. कायदे कितीही कडक असले तरी कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसेल, तर त्याची कशी पद्धतशीर वाट लागते, हे आठवडीबाजारात दिसून येते. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीची वाट बघण्यापेक्षा आता ग्राहकांनीच सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे.