शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

दारव्हा-नेरमध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेसची खेळी

By admin | Updated: July 25, 2015 02:47 IST

सध्या विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेसने दारव्हा-नेरमध्ये शिवसेनेला शह देण्याची एकही संधी सोडली नाही.

यवतमाळ : सध्या विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेसने दारव्हा-नेरमध्ये शिवसेनेला शह देण्याची एकही संधी सोडली नाही. काँग्रेसने आता या तालुक्यांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातील दोन अभियंत्यांच्या बढतीचे ‘टेंडर’ घेऊन आणखी एक खेळी रचल्याचे प्रकरण पुढे आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांच्या बदल्यांच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा वाद पहायला मिळतो. शिवसेनेचे पालकमंत्री असताना व त्यांचा दिग्रस-दारव्हा-नेर मतदार संघ असताना तेथे काँग्रेसकडून हेतुपुरस्सर परस्पर नियुक्त्या करून आणण्याचा प्रयत्न केला जातो. यवतमाळच्या बांधकाम कार्यकारी अभियंत्याकडे नेर, दारव्हा, बाभूळगाव, कळंब, घाटंजी या तालुक्यांची जबाबदारी आहे. नेर व दारव्हा हे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील तालुके यात समाविष्ठ आहेत. त्यामुळे कार्यकारी अभियंता या महत्वाच्या पदावर आपल्या मर्जीतील अधिकारी असावा अशी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याची मनिषा आहे. त्यासाठी पक्षातीलच सक्षम व मर्जीतील व्यक्तीला कामी लावले गेले आहे. या नेत्याची मुंबईतून साथ मिळते आहे. यवतमाळच्या पदावर सध्या असलेल्या अभियंत्याची बदली अथवा बढती होणे महत्वाचे आहे. हे अभियंते अलिाडेच आल्याने त्यांची बदली होणार नाही, याची जाणीव झालेल्या काँग्रेसने आता अभियंत्याला अधीक्षक अभियंतापदी तातडीने बढती मिळवून देण्याचे ‘टेंडर’ घेतले असल्याची चर्चा बांधकाम खात्यात आहे. सदर अभियंत्याने मात्र असे काही राजकीय प्रयत्न सुरू असल्याची बाब स्पष्टपणे नकारली आहे. त्यांच्या संभाव्य बढतीने रिक्त होणाऱ्या जागेवर मर्जीतील उपअभियंत्याला बसविले जाणार आहे. त्यासाठी या अभियंत्याला कार्यकारी अभियंतापदी तत्काळ बढती मिळवून देण्याचे दुसरेही ‘टेंडर’ घेतले गेले आहे. या कार्यकारी अभियंत्याला नेर-दारव्हामध्ये शिवसेनेच्या विरोधात व आपल्या सोईने वापरायचे असा हा काँग्रेसच्या मुळ तेथील बड्या नेत्याचा छुपा अजेंडा आहे. काँग्रेसच्या या खेळीपासून शिवसेना अनभिज्ञ आहे. (जिल्हा प्रतिनिधी)