शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

कफल्लक माजी शिक्षणाधिकाऱ्यांचा सन्मानासाठी संघर्ष

By admin | Updated: September 7, 2016 01:22 IST

मंगळवारी जिल्हा परिषदेत शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाले, तेव्हा शिक्षकांच्या चारचाकी गाड्यांनी परिसर

राजकीय नेत्याने केला घात : न्यायालयात जिंकले, आता समाजाच्या कोर्टात हवा न्यायअविनाश साबापूरे यवतमाळ मंगळवारी जिल्हा परिषदेत शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाले, तेव्हा शिक्षकांच्या चारचाकी गाड्यांनी परिसर गजबजून गेला. त्याचवेळी ८० वर्षांचे निवृत्त शिक्षणाधिकारी मात्र साध्या जुनाट स्कुटीवरून प्रसिद्धी माध्यमांच्या कार्यालयांचे पत्ते धुंडाळत होते. शिक्षक हारतुरे स्वीकारत असताना हा त्यांचा ‘माजी साहेब’ सन्मानासाठी संघर्ष करीत होता. निवृत्त होण्याच्या तीन दिवसांआधीच त्यांना खोट्या केसमध्ये अडकवून कारवाई करण्यात आली होती. १९९५ मधली ही घटना सांगताना त्यांचे खोल गेलेले डोळेच बोलत होते.साधा शिक्षकही चारचाकीतून फिरतो. अशावेळी संपूर्ण जिल्ह्याचा ‘बॉस’ राहिलेल्या निवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याची स्वारी जुनाट स्कुटीवर का, या औत्सुक्यातूनच ‘लोकमत’पुढे आला प्रशासनातील राजकीय हस्तक्षेपाचा वास्तव चेहरा. साधा शर्ट, चुरगळलेली पँट, दाढीचे खुंट वाढलेले, टोंगळ्यात वेदना असल्याने अडखळणारी पावले, हाती घरच्याच कापडातून शिवलेली पिशवी, त्यात घरूनच आणलेली पाण्याची बाटली... हे वर्णन एखाद्या गरीब शेतकऱ्याचे नव्हे बरं का! आपल्याच यवतमाळात जिल्हा शिक्षणाधिकारी राहिलेल्या संघर्षशील माणसाची ही अवस्था आहे. हरिश्चंद्र कणीराम जाधव हे त्यांचे नाव. वय ८० वर्षे! खोल गेलेल्या डोळ्यांना शोध आत्मसन्मानाचा!१९९२ ते १९९५ या चार वर्षात एस. के. जाधव यवतमाळ येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. कोणत्याही ‘वरकमाई’च्या फंदात ते पडले नाही. निवृत्त होईपर्र्यंत यवतमाळात त्यांचे घरही नव्हते. उलट आपल्याच पगारातून कधी कधी त्यांना सरकारमधील सदस्यांसाठी खर्च करावा लागत होता. जाधव यांनी सांगितले, सरकारमधील सदस्यांचा दौरा असला की, आम्हाला पैसे द्यावे लागायचे. मी कुठून देणार? मग पगाराचेच पैसे देऊन टाकायचो... अशी ही व्यक्ती ‘स्वच्छ’ मनाने निवृत्त होणार होती. पण निवृत्त होण्याच्या तीन दिवसांपूर्वीच राजकारणाने त्यांना डाग लावला. जाधव यांनी सांगितले की, त्यावेळी पांढरकवडा येथील केईएस शाळेतील सेंगर नामक शिक्षकाला मुख्याध्यापक करण्याचा ठरावा आला होता. तो नियमानुसार होता, त्यानुसार मी मान्यताही दिली. मात्र, तत्कालीन सरकारमध्ये सदस्य राहिलेल्या राजकीय नेत्याने दुसऱ्याच एका शिक्षकाला मुख्याध्यापक करण्याचा आग्रह धरला. तो नियमात नव्हता. त्यामुळे मी नकार दिला. त्यानंतर पांढरकवडा येथील विश्रामगृहात मला बोलावून दबाव टाकण्यात आला. हा गैरप्रकार करण्यास मी नकार दिल्याने ते चिडले. शिक्षणाधिकाऱ्याने सरकारच्या सदस्याला अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा माझ्यावर आरोप लावण्यात आला. खोटी केस करून मला अटक करण्यात आली. पण पुरावाच नसल्याने त्यातून मी निर्दोष सुटलो. निवृत्तीच्या वेळी डाग मात्र लागला. काही दिवस शासनाने माझा पैसाही रोखला. माझे मूळगाव वाई बाजार येथील शेत विकून घर बांधावे लागले. आपण निर्दोष असल्याचे ते लोकांना पटवून देतात...निवृत्त शिक्षणाधिकाऱ्याचा हा संघर्ष गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. या अपमानाविरुद्ध शेवटी जाधव यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. सुरूवातीला त्यांना अपयश आले. पण ते लढत राहिले. नुकताच आॅगस्टमध्ये या खटल्याचा निकाल लागला. निवृत्त शिक्षणाधिकारी यांच्या बाजूने सन्मानजनक निर्णय न्यायालयाने दिला. निलंबित केल्याबद्दल नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.