शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

बँकांकडून विविध सेवा करांच्या नावावर मोठी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या सेवा आता ग्राहकांना लुबाडणाऱ्या ठरत आहेत. बँका आपल्या ग्राहकांकडून विविध सेवांच्या नावाखाली खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम कापून आपल्या खिशात भरत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची बँक म्हणवून घेणारी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वांत आघाडीवर असल्याचे खातेदारांच्या लक्षात आले आहे.कधीकाळी बँकाच्या ...

ठळक मुद्देजिल्हा बँक आघाडीवर : ग्राहकांना अकारण भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या सेवा आता ग्राहकांना लुबाडणाऱ्या ठरत आहेत. बँका आपल्या ग्राहकांकडून विविध सेवांच्या नावाखाली खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम कापून आपल्या खिशात भरत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची बँक म्हणवून घेणारी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वांत आघाडीवर असल्याचे खातेदारांच्या लक्षात आले आहे.कधीकाळी बँकाच्या सेवा मोफत असायच्या. ग्राहकांचे बचत खाते व ठेवखात्यात असलेल्या रकमेतून मिळणाऱ्या जादा व्याजावर बँकाचा नफा ठरायचा. त्या नफ्यातून बँका आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च करूनही बँकाना फायदा व्हायचा. मात्र जेव्हापासून बँकामध्ये संगणकीकरणाचा प्रवेश झाला, तेव्हापासून बँका पूर्णपणे व्यावसायीक बनल्या आहेत. आता कोणतीही बँक ग्राहकांना मोफत सेवा देत नाही, तर विविध सेवांच्या नावाखाली खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम कपात करते. ही रक्कम ग्राहकांना नगण्य वाटत असली तरी लाखो खातेदारांकडून करोडो रूपयांची माया जमवून बँका आपला खिसा गरम करून घेत आहे. विविध सेवांचे दरही बँकनिहाय वेगवेगळे दिसून येत आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक इतर बँकेच्या तुलनेत अधिक वसुली करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका खातेदाराने त्यांच्या विविध बँकाच्या खात्यातील कापलेली रक्कम तुलनात्मक मांडली. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एटीएम कार्डाचे वार्षिक शुल्क १७७ रूपये, वार्षिक सेवा कर ५९ रूपये व एसएमएस चार्जेसचे ७०.८० रूपये, असे ३०६.८० रूपये ग्राहकांच्या खात्यातून कपात केले आहे. वास्तविक पाहता जिल्हा बँकेचे स्वत:चे एटीएम जिल्ह्यात कोठेही नाही. यस बँकेच्या भरवशावर ही सेवा सुरू आहे. मात्र पुसद अर्बन बँकेने ग्राहकांकडून वसुल केलेले ईन्सीडेन्सी चार्जेसचे १०८ रूपये ग्राहकांना पुन्हा परत केले आहे, तर भारतीय स्टेट बँकेने एटीएम कार्डाची वार्षिक फि १४७ रूपये व एसएमएस चार्जेसचे २४ रूपये, असे १७१ रूपये कपात केले आहे. एकंदरीत ग्राहकांना बँकाचे संगणकीकरण तोट्यात आणणारे ठरत आहे.शेतकऱ्यांच्या हिताची बँक कशी?जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या हिताची बँक म्हणून ओळखली जाते आणि याच बँकेद्वारे शेतकऱ्यांकडून विविध सेवा करांच्या नावावर मोठी रक्कम वसुली केली जात असल्याने ही बँक शेतकºयांच्या हिताची कशी असा प्रश्न विचारला जात आहे.