शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

एटीआय व यांत्रिकांची स्टेअरिंगवर एन्ट्रीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

सहायक वाहतूक निरीक्षक चालकांमधून पदोन्नती झालेले आहेत. यवतमाळ विभागात २० पेक्षा अधिक हे निरीक्षक आहेत. त्यांच्याकडे बस चालविण्याचा दांडगा अनुभव तसेच परवानाही आहे. त्यांची सेवा घेण्याचे निर्देश मध्यवर्ती कार्यालयाने दिले आहेत. प्रत्यक्षात यवतमाळ विभागात नाममात्र वाहतूक निरीक्षक कामगिरीवर पाठविले जात आहे. तसेच यांत्रिक कर्मचाऱ्यांची सेवाही घेण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची माहिती आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : चालक नसल्यामुळे एसटीच्या बसफेऱ्या वाढविता येत नाहीत, असे महामंडळाकडून सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे संपात सहभागी नसलेले यांत्रिक कर्मचारी आणि सहायक वाहतूक निरीक्षकांना चालक म्हणून पाठविण्याकडे यंत्रणेची चालढकल सुरू आहे. या सर्व प्रकारात अधिकाऱ्यांचा त्रास वाचविला जात असला तरी, प्रवासी वर्ग मात्र त्रस्त बनला आहे. सहायक वाहतूक निरीक्षक चालकांमधून पदोन्नती झालेले आहेत. यवतमाळ विभागात २० पेक्षा अधिक हे निरीक्षक आहेत. त्यांच्याकडे बस चालविण्याचा दांडगा अनुभव तसेच परवानाही आहे. त्यांची सेवा घेण्याचे निर्देश मध्यवर्ती कार्यालयाने दिले आहेत. प्रत्यक्षात यवतमाळ विभागात नाममात्र वाहतूक निरीक्षक कामगिरीवर पाठविले जात आहे. तसेच यांत्रिक कर्मचाऱ्यांची सेवाही घेण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची माहिती आहे. यवतमाळ विभागात सध्या केवळ ११७ चालकांच्या भरवशावर बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. एक चालक जवळपासच्या गावांकरिता केवळ दोन फेऱ्या करून एसटी बस आगारात लावून देतो. सहायक वाहतूक निरीक्षक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांची कामगिरी लावल्यास निश्चितच बसफेऱ्या वाढतील, असे सांगितले जाते. मात्र, याची अंमलबजावणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून का केली जात नाही, हा प्रश्न आहे.

अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव- एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागात काही अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. उत्पन्न किती आले, वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक, यांत्रिक कर्मचारी अशा किती कर्मचाऱ्यांची कामगिरी लावण्यात आली, याविषयीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे उपलब्ध राहत नाही. एकमेकांकडे बोट दाखविले जाते. तसा आजारच जणू यवतमाळ विभागाला जडला आहे. प्रजासत्ताकदिनी संपकरी कर्मचाऱ्यांना ध्वजवंदनास मज्जाव करण्यात आला. या प्रकाराची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी बयान नोंदविले. त्यात आगार व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांनी एकमेकांकडे बोट दाखविल्याचे बयानावरून स्पष्ट झाले. तूर्तास तरी हे प्रकरण थंड बस्त्यात आहे.

वाहतूक नियंत्रकांकडून केवळ स्पाॅट बुकिंगवाहकांमधून वाहतूक नियंत्रक झालेले यवतमाळ विभागात २०० हून अधिक अधिकारी आहेत. त्यांची कामगिरी तिकीट बुकिंगसाठी लावण्यात आली आहे. यातील बहुतांश अधिकारी केवळ बसस्थानकावर बुकिंग करून एसटी बस रवाना करतात. मार्गात मिळणारे प्रवासी घेण्याची सोयच चालकाकडे राहत नाही. वाहतूक नियंत्रक पूर्णवेळ बसमध्ये राहिल्यास अनेक प्रवासी मिळतील, असे ठामपणे सांगितले जाते. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप