शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: February 16, 2017 00:13 IST

येथील कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली.

दारव्हा येथील घटना : वणी येथील रहिवासी, कमी गुण मिळाल्याची खंत दारव्हा : येथील कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास येथील कवितानगरात घडली. प्रतिमा प्रकाश कुचनकर (२१) रा. वणी असे विद्यार्थिनीचे नाव आहे. ती येथे गोविंदराव खाडे यांच्या घरी भाड्याने खोली करून राहत होती. मंगळवारी दुपारी ही विद्यार्थिनी तिच्या वणी येथील घरुन दारव्हा येथे आली होती. ५.३० वाजताच्या सुमारास तिने आपण दारव्हा येथे पोहोचल्याचे फोन करून घरी सांगितले होते. रुममधील मैत्रिणी बाहेर गेल्यानंतर दार आतून बंद करून स्लॅबच्या हुकला ओढणीने गळफास लावून तिने आत्महत्या केली. मैत्रिणी बाहेरुन आल्यानंतर दार आतून बंद असल्याचे आणि कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून डोकावले असता सदर युवती गळफास लावलेल्या स्थितीत आढळली. दोन दिवसांपूर्वी कृषीच्या तृतीय वर्षाच्या पाचव्या सेमिस्टरचा निकाल लागला. यात प्रतिमाला एका विषयात कमी गुण मिळाले. त्यामुळे ती अस्वस्थ होती, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप सायरे करीत आहे. (प्रतिनिधी)