शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळाचे पाणी यवतमाळात पोहोचूनही शहरात पाणीपुरवठ्याची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

यवतमाळ शहराला मागील दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निळोणा, चापडोह या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये आठ दिवसाआड पाणी नळाला सोडले जात होते. दोन महिन्यांपासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही भागांत चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. अलीकडे दोन आठवड्यांपासून मात्र पाणीपुरवठ्याची संपूर्ण घडी विस्कळीत झाली आहे. याला प्राधिकरणाची यंत्रणा जबाबदार असल्याचे बोलले जाते. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निळोणा, चापडोह आणि आता बेंबळा प्रकल्पाचे पाणी मिळत असतानाही यवतमाळकर नागरिकांना पाण्यासाठी चटके सोसावे लागत आहेत. शहराला आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा उदासीन आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शहराची तहान भागविली जात आहे. वरिष्ठांपासून ते बहुतांश अधिकारी-कर्मचारी गंभीर नसल्याचे दिसून येते. यवतमाळ शहराला मागील दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निळोणा, चापडोह या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये आठ दिवसाआड पाणी नळाला सोडले जात होते. दोन महिन्यांपासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही भागांत चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. अलीकडे दोन आठवड्यांपासून मात्र पाणीपुरवठ्याची संपूर्ण घडी विस्कळीत झाली आहे. याला प्राधिकरणाची यंत्रणा जबाबदार असल्याचे बोलले जाते. वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पाण्याच्या टाक्या भरल्या जात नाहीत, अशी कारणे यासाठी सांगितली जातात, तर दुसरीकडे पाण्याच्या टाक्यांमधून धो-धो पाणी वाहते. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या पाण्याच्या अपव्ययाचा हिशेबच नाही. शहरात लिकेजमधून पाणी वाहते. दुरुस्ती करूनही त्याच त्या ठिकाणी होणारे लिकेज संशयाला जागा निर्माण करून देणारे आहे. अशावेळी कितीही प्रकल्पाचे पाणी आणले तरी टंचाई जाणवणारच अशा तीव्र भावना नागरिकांमधून उमटत आहेत. पाण्याची साठवणूक करण्यासाठी लोकांकडे मर्यादित साधने आहेत. घरातील पाणी संपल्यानंतर हातपंपाशिवाय उपाय नाही. शरीराची काहिली करणारे ऊन तापत आहे. त्यामुळे आजाराला निमंत्रण मिळते. 

चापडोहमध्ये ६० टक्के पाणी- अर्ध्या अधिक शहराची तहान भागविणाऱ्या चापडोह प्रकल्पात अजूनही ६० टक्क्यापेक्षा अधिक पाणीसाठा आहे. निळोणा प्रकल्पही ४० टक्के भरून आहे. गतवर्षीही अखेरपर्यंत इमर्जन्सी वापरले गेलेले नव्हते. यावेळी तर बेंबळा सोबतीला आहे. याही परिस्थितीत पाणीप्रश्न निर्माण झाल्यास प्राधिकरणाची यंत्रणाच जबाबदार राहील हे तेवढेच खरे.

अधिकाऱ्यांकडे बोलायला वेळ नाही- यवतमाळ शहरातील नागरिक पाणीटंचाईचे चटके सहन करीत असताना अधिकाऱ्यांकडे त्यांच्याशी बोलायला वेळ नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काही वरिष्ठ अधिकारी फोनही उचलत नाहीत. काही जणांचा मोचाइल स्वीच ऑफ दाखवितो. - कार्यालयातील फोन तर कायम व्यस्त असतो. शिवाय जबाबदार (?) अधिकारी बऱ्याच वेळा कार्यालयात उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. अशा वेळी समस्या मांडायची कुणाकडे, हा प्रश्न आहे. पाण्याची कृत्रिम टंचाई शहरात निर्माण होत आहे. 

 

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प