वाशिम : जिल्हावासीयांच्या नजरा खिळून असलेल्या विधानसभा निवडणूकीचा बिगुल अखेर १२ सप्टेंबरला वाजला. निवडणूक आयोगाने निवडणूकीसाठी १५ स प्टेंबरला मुहूर्त ठरविला अन् अचानक पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात जिल्हाभरातील राजकारण तापायले सुरूवात झाली. छोट्या-मोठय़ा सर्वच राजकीय पक्ष्यांनी विधानसभा निवडणूकीच्या मोर्चेबांधणीची गती वाढविली असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाकडुन १५ ऑगस्ट नंतर लगेच निवडणूक कार्यक्रम घोषीत होईल अशी अपेक्षा जिल्हावासीयांना होती. मात्र ऑगस्ट महिना संपला तरी, निवडणूक जाहीर झाली नाही. त्यानंतर गणेशोत्सवानंतरच आयोग निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करेल असे बोलल्या जात होते. अखेर अपेक्षेप्रमाणे १२ सप्टेंबरला निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीचा मुहूर्त घोषीत केला. विधानसभेची निवडणूक घोषीत होताच राजकीय पक्षांनी व इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली. जिल्ह्यात विधानसभेचे तिन मतदार संघ आहेत. यापैकी वाशिम मतदार संघ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षीत आहे. शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये वाशिम व रिसोड मतदार संघ भाजपकडे तर एकमेव कारंजा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्यावर आहे. कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीत रिसोड व वाशिम कॉग्रेसच्या वाट्यावर तर कारंजा राष्ट्रवादी कॉग्रेसकडे आहे. महायुती व आघाडीकडुन निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेकांनी बाशिंग बांधून ठेवले आहे. मात्र, निवडणूक कार्यक्रमच जाहीर झाला नसल्यामुळे कुण्याच पक्षाने अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. आता निवडणूक जाहीर झाली असुन लवकरच उमेदवार याद्या जाहीर होणार आहेत. त्यासाठी इच्छूकांनी मोर्चेबांधणीची गती वाढविली आहे.** १५ ऑक्टोबरला होणार विधानसभेसाठी मतदानसद्या पावसाळ्याचा मोसम आहे. त्यामुळे स्वाभाविकच जिल्ह्यातील वातावरणही कमालीचे थंड आहे. परंतु निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणूका जाहीर केल्यामुळे अचानक थंडीतही जिल्ह्यातील राजकीय वातावरणात गरमी संचारली आहे.** १९ ऑक्टोबरला पार पडणार मतमोजणीराजकीय पक्षांनी इच्छूकांची चाचपणी यापूर्वीच पूर्ण केली आहे. मुलाखतीही घेतल्या आहेत. परंतु अद्याप एकाही पक्षाने उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच इच्छूक आपल्यालाच उमेदवारी मिळत असल्याचा दावा करीत आहेत.** उमेदवार्यांकडे खिळल्या जिल्हावासीयांच्या नजराराजकीय पक्ष बंडखोरी टाळण्यासाठी अद्याप उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करीत नसल्याचे बोलले जात आहे उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी प्रत्येक पक्षाने त्यांच्या संभाव्य उमेदवारांना कामाला लावल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजला
By admin | Updated: September 12, 2014 23:04 IST