वाशिम : विधानसभा निवडणूकीमध्ये प्रचार तसेच इतर कारणांसाठी उमेदवारांकडून वापरल्या जाणार्या वस्तूंचे दर निश्चित करण्यासंदर्भात राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकारी यांची प्रा थमिक बैठक जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये दर निश्चि तीसाठी २५ सप्टेंबरला बैठक घेऊन दर निश्चिती करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उ पजिल्हा निवडणूक अधिकारी बी.के. इंगळे, यांच्यासह सर्व मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रचार व इतर कारणांसाठी लागणार्या वस्तुंची यादी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांना वितरीत करण्यात आली. यानुसार २२ स प्टेंबर पयर्ंत वस्तुंचे दर निवडणूक विभागाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राजकीय पक्षाकडुन दर प्राप्त झाल्यानंतर याविषयी २५ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन अंतिम दर निश्चित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
दर निश्चितीसाठी गुरूवारचा मुहूर्त
By admin | Updated: September 21, 2014 22:38 IST