पाेलिसांच्या रात्रीच्या गस्तीत वाढ
वाशिम : वाशिम शहरात रात्रीच्या सुमारास ८ वाहनांद्वारे गस्त घातली जात असून, चोऱ्या, घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोलीस पुरेसे प्रयत्न करीत आहेत. त्यात बहुतांशी यश मिळाले असून, पाेलिसांच्या रात्रीच्या गस्तीत वाढ झालेली दिसून येत आहे.
अनसिंग रस्त्यावर वृक्ष लावा : मागणी
वाशिम : वाशिम ते अनसिंग या रस्त्याचे रुंदीकरण करीत असताना मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले. मात्र, त्याठिकाणी नव्याने वृक्षलागवड करण्याचा संबंधित कंत्राटदाराला विसर पडला आहे. वृक्षलागवड करण्याची मागणी अविनाश मुळे यांनी केली.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोनापासून बचावासाठी शासनाने आखून दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वत:चे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.