मंगरूळपीर :ह्यलोकमतह्ण द्वारा आयोजित स्पोर्टस् बूक २0१४ चे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम येथील नाथ विद्यालयात सोमवार ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मोठय़ा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विविध बक्षीसाचे वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा.नंदलाल पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून ए.एन.सोनोने, एस.के.राठोड, ए.के. पवार, जे.डी.कांबळे, आय.टी. राठोड, एस.आर. खडसे, एस.एस. वडे, जे.ए.मुडे, एस.एस.नांदे, नाना देवळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम बक्षीसाचे मानकरी सीमा किशन भगत हिला मुख्याध्यापक प्रा.नंदलाल पवार यांच्या हस्ते पियाने वितरण केले. तसेच द्वितीय बक्षीस ओम दत्तात्रय राऊत याला ट्रॉली बॅग तर तृतीय बक्षीस प्रतिक रामेश्वर म्हातारमारे याला बॅडमिंटन सेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे. याशिवाय विद्यालयातील ७४ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन बक्षीस म्हणून पेन देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाथ विद्यालयातील कर्मचारी वर्गांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
‘लोकमत’ स्पोर्टस् बूकचे बक्षीस वितरण
By admin | Updated: July 7, 2014 23:43 IST