लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उघड्यावर शौचास जाणाºया मालेगाव तालुक्यातील वडप या गावातील रमेश दगडुजी चंदनशिव या सरपंचपतीच्या न्यायालयीन प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. ११ सप्टेंबर रोजी मालेगाव येथील न्यायालयात तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांची साक्ष झाली असुन पुढील सुनावणी १६ सप्टेबर रोजी होणार आहे.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत तालुका व जिल्हा पातळीवर गुड मॉर्निंग पथके स्थापन करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग प्रमुखदेखील या पथकात सहभागी होऊन लोटाबहाद्दरांविरूद्ध कारवाई करतात. अशाच एका कारवाईत २९ डिसेंबर २०१६ रोजी वडप येथील रमेश दगडुजी चंदनशिव यांना पथकातील अधिकाºयांनी पकडले असता, त्यांनी पथकातील सदस्यांसोबत हुज्जत घातली. पथक प्रमुख तथा बहिला व बालकल्याण विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्याशी चर्चा करुन २ जानेवारी २०१७ रोजी मालेगाव पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली. या तक्रारीवर जवादे यांच्यासह मालेगाव तालुक्याच्या समन्वयक पुष्पलता अफुणे, विस्तार अधिकारी बापुराव ठाकरे आणि वाहन चालक सुरेश वानखेडे यांच्या स्वाक्षरी आहे. यावरुन मालेगाव पोलिसांनी भादंवी कलम ३५३ व ५०४ नुसार गुन्हा दाखल केला होता. सध्या हे प्रकरण मालेगाव येथील न्यायालयत सुरु असुन याबाबत ११ सप्टेंबरला वरिष्ठ अधिकाºयांची साक्ष घेण्यात आली. पुढील सुनावणी १६ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली असून, न्यायालयाच्या निकालाकडे जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सरकारी वकील रतनवरे हे या प्रकरणाची बाजु मांडत आहेत तर प्रतिपक्षाच्या वतीने अॅड. मगर हे काम पाहत आहेत.
उघड्यावर शौचास जाणा-या सरपंचपतीचे प्रकरण न्यायालयात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:22 IST
वाशिम : उघड्यावर शौचास जाणाºया मालेगाव तालुक्यातील वडप या गावातील रमेश दगडुजी चंदनशिव या सरपंचपतीच्या न्यायालयीन प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. ११ सप्टेंबर रोजी मालेगाव येथील न्यायालयात तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांची साक्ष झाली असुन पुढील सुनावणी १६ सप्टेबर रोजी होणार आहे.
उघड्यावर शौचास जाणा-या सरपंचपतीचे प्रकरण न्यायालयात !
ठळक मुद्देउपमुख्य कार्यकारी अधिका-यांची साक्ष हुज्जत घातल्याने केली होती कारवाई