लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील ब्रम्हा ग्रामपंचायतीचे सरपंच दिनकर नारायण मुसळे यांच्याविरुध्द उपसरपंचासह सात सदस्यांनी बुधवार, १३ सप्टेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार सरपंचावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली.सरपंच दिनकर मुसळे हे सदस्यांना विश्वासात घेत नसून पदाचा दुरुपयोग करित आहेत. स्त्री सदस्यांचा जाणीवपुर्वक अपमान करुन त्यांना त्रास दिला जात आहे. सदस्यांना शासकीय योजनेची माहिती देत नसून सभेसमोर त्याचे विवेचन करत नाहीत. त्यामुळे गावातील विकास व योजनेची कामे त्यांच्या कार्यकाळात ठप्प झाली आहेत. सरपंच हे सदस्यांशी गैरवर्तन करून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात. गावातील नागरिकांसमोर अपमानित करतात. ग्रामसभेपासून शासकीय योजनांची नीट मांडणी करण्यापासून सदस्यांना रोखतात व त्यांना बोलू देत नाहीत. तसेच त्यांचे निवेदने देखील स्विकारत नाहीत. या सर्व बाबीमुळे सरपंचावर आमचा विश्वास राहीला नसल्याचे सदस्यांनी अविश्वास प्रस्तावात नमूद केले आहे. या अविश्वास प्रस्तावावर उपसरपंच गजानन ईसापुरे, सदस्य लिलाबाई मुसळे, शारदा मुसळे, संदीप मुसळे, रामदास सावंत, लक्ष्मी कांबळे, सुशिला धोंगडे, सुजानबाई नागरे यांच्या स्वाक्षºया १आहेत.
ब्रम्हा येथील सरपंचाविरुध्द अविश्वास प्रस्ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:58 IST
ब्रम्हा ग्रामपंचायतीचे सरपंच दिनकर नारायण मुसळे यांच्याविरुध्द उपसरपंचासह सात सदस्यांनी बुधवार, १३ सप्टेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार सरपंचावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली.
ब्रम्हा येथील सरपंचाविरुध्द अविश्वास प्रस्ताव!
ठळक मुद्देसरपंच दिनकर नारायण मुसळे यांच्याविरुध्द अविश्वास प्रस्ताव!पदाचा दुरुपयोग; कारवाई करण्याची मागणी