कारंजा : तालुक्यातील मनभा येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात विविध समस्या आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा असा उपदेश प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी गावकर्यांना देतात. मात्र ७ जुलै रोजी प्रत्यक्ष निरीक्षण केले असता या प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. आरोग्य केंद्राच्या परिसरातील पथदिवे नादुरूस्त आहेत. त्यामुळे परिसरात रात्रीला अंधाराचे साम्राज्य दिसून येते. टाकावू वस्तूंचा परिसरात खच पडला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध समस्या संबंधितांनी दूर कराव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे.
प्राथमिक आरोग्य केन्द्राची दुरवस्था
By admin | Updated: July 8, 2014 22:52 IST