मानोरा : मानोरा ग्रामपंचायतमध्ये ज्या ४0 अतिक्रमणधारकांनी मागील ३५ वर्षापासून पक्के घर बांधून अतिक्रमण केले होते. त्या अतिक्रमण धारकांना मोठया प्रयासानंतर नमुना ८ अ पोलीसांच्या उपस्थितीत देण्यात आले. अतिक्रमणधारकांना नमुना ८ अ मिळावा याकरीता अनेक राजकीय पक्षाच्या पुढार्यांनी जागेचा नमुना ८ अ मिळावा म्हणून आमरण उपोषण सुध्दा केले होते. नमुना ८ अ देण्यास विलंब होत असल्याने यावेळी ग्रा.पं.कार्यालयाजवळ मोठय़ा प्रमाणात जमाव जमा झाला होता. ग्रा.पं.प्रशासनाने कठलाही अनुूचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी पोलीसांना पाचारण केले होते. मात्र अतिक्रमण धारकांनी ८ अ भेटल्याशिवाय जाणार नसल्याचे सांगितल्याने अखेर पोलीसांच्या उपस्थितीत ते वाटप करण्यात आले. मानोरा शहरात गेल्या अनेक वर्षापासून सुमारे ५00 ते ६00 अतिक्रमणधारकांनी आपली घरे ग्रा.पं. च्या हद्दीत बांधली होती. त्यांना हक्काच्या जागेचा नमुना ८ अ मिळावा म्हणून विविध राजकीय पक्षाच्या पुढारी व नेत्यांनी तहसील कचेरीसमोर आमरण उपोषण व आंदोलने केलीत त्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. मानोरा जि.प.सर्कलचे जि.प.सदस्य रणजित जाधव यांनी येथील अतिक्रमण धारक महिला व पुरूष यांना सोबत घेवून ग्रा.पं.कार्यालय गाठले. सचिव यांना ८ अ दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही व सचिव यांना जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला होता. यावेळी ग्रा.पं.प्रशासनाने तात्काळ मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस.एल.दोनकलवार यांना माहिती देवून पोलीसाचा ताफा घटनास्थळी बोलाविला. यावेळी ग्रा.पं.चे सरपंच, ग्रा.पं.पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पोलिसांच्या उपस्थितीत ‘नमुना ८ अ’ चे वाटप
By admin | Updated: August 4, 2014 00:18 IST