जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पहिल्या दिवशी ० ते ५ वर्षे वयोगटातील एक लाख २० हजार ७९९ पैकी एक लाख सात हजार ६६७ बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. बूथवर न आलेल्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी ग्रामीण भागामध्ये २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान आणि शहरी भागामध्ये २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान घरोघरी जाऊन त्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. याकरिता ग्रामीण भागात १,६३४, तर शहरी भागात ८१, अशा एकूण १ हजार ७१५ चमू कार्यरत आहेत. दोन दिवसांत जवळपास तीन हजार बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. वीटभट्ट्या, गिट्टी खदान, मजुरांच्या वस्त्यांमधील बालकांना लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात २२ व शहरी भागात ८, अशा एकूण ३० मोबाइल टीम कार्यरत आहेत.
कोट बॉक्स
जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी बूथवर न आलेल्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी ग्रामीण भागात २ ते ४ फेब्रुवारी आणि शहरी भागात २ ते ६ फेब्रुवारी यादरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना अद्याप पोलिओ डोस मिळाला नसेल, तर पालकांनी नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
-डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
0०००
बॉक्स
तालुकानिहाय पोलिओ घेतलेल्या बालकांची संख्या
तालुका अपेक्षित लाभार्थी पोलिओ घेतला
वाशिम १५,६९९ १४,५९०
मालेगाव १७,२६३ १६,२१०
कारंजा ११,४७३ ११,५३०
रिसोड १४,४६० १३,६५०
मं.पीर ११,४१२ १०,५९०
मानोरा १४,८३२ १४,४९०
शहरी ३५,६६० २९,५८०