वाशिम : सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिकचा जिल्हय़ात राजरोसपणे वापर सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या पत्राला पालिकेने केराची टोपली दाखविल्याचे आज १८ सप्टेंबर रोजी लोकमत टिमने केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून उघडकीस झाले. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे कचरा व्यवस्थापनात अडचणी येतात. प्लास्टिकमधील विघटन न होणार्या रसायनामुळे पर्यावरणाला मुख्य धोका निर्माण झाला आहे, हे सर्वङ्म्रृत आहे तरीसुद्धा जिल्हय़ामध्ये याचे कुणालाही काही देणे-घेणे नसून, ग्राहक तर कॅरीबॅग्ज मागतातच शिवाय दुकानदारही बिनदिक्कतपणे ते देत असल्याचे लोकमत चमूने केलेल्या स्टिंगद्वारे उघडकीस झाले आहे. ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक यादृष्टीने जास्त धोकादायक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ११ मे २0११ च्या आदेशानुसार ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरावर बंदी घातली असतानासुद्धा या आदेशाच्या नियमांची पायमल्ली सर्रास होत आहे. जिल्हय़ातील वाशिम, कारंजा, मालेगाव, रिसोड शहरामध्ये केलेल्या स्टिंग ऑपरशनमध्ये प्रत्येक शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर दिसून आला. प्लास्टिक बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेऊन पर्यावरणाला निर्माण झालेला धोका दूर करणे गरजेचे झाले आहे.
‘पॉलिथीन’ बंदीचा आदेश धाब्यावर !
By admin | Updated: September 19, 2014 01:45 IST