शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

मूग, उडिदाच्या हमीभावाच्या नियमाला कोलदांडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:46 IST

वाशिम : बाजार समित्यांमध्ये उडीद व मुगाला हमीभावापेक्षा  अल्प दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचे ‘बजेट’ कोलमडत  आहे. हमीभावाने मूग व उडिदाची खरेदी व्हावी, यासाठी नाफेड  केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा, अशी सूचना  आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग  अधिकार्‍यांना केली. 

ठळक मुद्देबाजार समित्यांमधील चित्र नाफेड केंद्राबाबत अधिकार्‍यांमध्ये पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बाजार समित्यांमध्ये उडीद व मुगाला हमीभावापेक्षा  अल्प दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचे ‘बजेट’ कोलमडत  आहे. हमीभावाने मूग व उडिदाची खरेदी व्हावी, यासाठी नाफेड  केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा, अशी सूचना  आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग  अधिकार्‍यांना केली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकर्‍यांना पावसाची योग्य प्रमाणात  साथ मिळाली नाही. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर  अल्पावधीतच पाऊस गायब झाला. त्यानंतरही पावसात सातत्य  नसल्याने काही शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. ऐन  शेंगा धरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारली. त्यामुळे मूग  व उडिदाच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट आली. नैसर्गिक संकटे  झेलत असतानाच, आता मानवनिर्मित चक्रव्यूहात बळीराजा  अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. २0१७-१८ या हंगामातील  मूग व उडीद बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. मूग पिकाला  ५३७५ रुपये दर व २00 रुपये बोनस असा एकूण ५५७५ रुपये  हमीभाव तर उडीद पिकाला ५२00 रुपये दर व २00 रुपये बोनस  असा एकूण ५४00 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.  या हमीभावानुसार चांगल्या दर्जाच्या उडीद व मुगाची बाजार  समितीत खरेदी होणे अपेक्षित आहे; मात्र कोणत्याच दर्जाच्या  मूग व उडिदाची खरेदी बाजार समितीत हमीभावाने सुरू  नसल्याचे वास्तव आहे. हमीभावापेक्षा थोड्याफार कमी फरकाने  मूग व उडिदाची खरेदी झाली तरीदेखील शेतकर्‍यांना फारसा  तोटा होणार नाही; मात्र हमीभावापेक्षा तब्बल एक हजार ते  १३00 रुपयांपेक्षा कमी दराने उडीद व मुगाची खरेदी होत  असल्याने शेतकर्‍यांचे संपूर्ण बजेट कोलमडून जात आहे. शे तमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, अशी  मागणी सर्वांकडूनच केली जाते. अद्यापही उत्पादन खर्चावर  आधारित भाव मिळत  नाही. कधी ओला तर कधी कोरड्या  दुष्काळाचे दुष्टचक्र भेदून कष्ट करणार्‍या  बळीराजाला सुरुवा तीला पेरलेले उगवेल का, याची चिंता असते. जे उगवले ते  कवडीमोलाने विक्री होत असल्याची वेदना घेऊनच वाटचाल  करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही. शेतकर्‍यांचा शेतमाल  बाजारात आला की गगनाला भिडलेले भाव तळाशी येतात, हा  दरवर्षीचा अनुभव आताही शेतकर्‍यांना येत आहे. अल्प भाव  मिळत असल्याने लागवड खर्च अन् उत्पन्नाचा ताळमेळ  बसविण्यात शेतकर्‍यांची झोप उडाली आहे.गुरुवारी जिल्हय़ातील बाजार समितींमधील उडीद व मुगाच्या  बाजारभावावर नजर टाकली असता, हमीभावापेक्षा १२00 रु पयांनी खरेदी सुरू असल्याचे दिसून आले. उडिदाला ३५00 ते  ४२0१ रुपये तर मुगाला ४000 ते ४४00 रुपये क्विंटल असा  बाजारभाव होता. मुगाची आवक ७५0 क्विंटल तर उडिदाची  आवक २७५0 क्विंटल होती. 

नाफेड केंद्र सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा!शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने वाशिम जिल्हय़ात  आधारभूत किमतीने उडीद व मुगाची खरेदी होण्यासाठी नाफेड  केंद्र सुरू करावे, अशी मागणी वाशिम बाजार समितीचे संचालक  राजू चौधरी यांनी १३ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक रमेश  कटके यांच्याकडे केली होती. याची दखल घेत कटके यांनी आ ता जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांशी संपर्क साधून, पत्रव्यवहार  केला आहे. नाफेडमार्फत मूग व उडिदाचे हमीभाव खरेदी केंद्र  सुरू करण्याबाबत प्रधान कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधावा,  अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग  अधिकार्‍यांना पत्राद्वारे केली आहे.