वाशिम : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अनेक पदाच्या पदोन्नतीचा गुंता अनेक वर्षापासून पडलेला होता. हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला. त्यामध्ये कनिष्ठ विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या पदोन्नती झाल्या आहेत. वाशिम जि.प. अंतर्गत शिक्षण विभागामध्ये वाशिम जि.प. अंतर्गत शिक्षण विभागामध्ये वाशिम जि.प. स्थापन झाल्यापासून कनिष्ठ विस्तार अधिकारी तसेच बारा वर्षापासून केंद्र प्रमुख पदांच्या पदोन्नत्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे अतिशय महत्वाच्या या खात्याचे कामकाज प्रभारी नियुक्तद्वारे सुरु होते. कनिष्ठ विस्तार अधिकार्याचे १४ तर केंद्रप्रमुखांचे २५ पदे रिक्त होती. सदर पदांचा प्रभार जि.प. शिक्षकांकडे देण्यात येत होता. त्यामुळे अनेक समस्या या विभागात निर्माण होत होत्या. तसेच अनेक प्रशासकीय कामांनाही खूप उशिर होत होता. आता या पदोन्नत्यामुळे कारभार सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पदोन्नत्या रखडल्यामुळे शिक्षकांवर खूप अन्याय सुद्धा होत आहे, अशी भावना शिक्षक संघटनामध्ये झाली होती. त्यामुळे सर्व शिक्षक संघटनांची पदोन्नती बाबत आग्रही मागणी होती. पदोन्नत्या झाल्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण विभागातील पदोन्नती करताना येणार्या अनेक अडचणी दूर करण्यासाठी जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, शिक्षणाधिकारी पेंदोर व सर्व शिक्षण विभाग यांनी प्रयत्न केले. जि.प. अध्यक्षा सोनाली जोगदंड, उपाध्यक्ष सर्व सभापती जि.प. यांनी मोलाचे सहकार्य केले.
शिक्षण विभागातील पदोन्नतीचा प्रश्न सुटला
By admin | Updated: August 4, 2014 00:26 IST