रिसोड : येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये राहत असलेल्या बेबी मधुकर इंगळे यांच्या घरात बुधवार २५ जून रोजी नऊच्या सुमारास शॉटसर्किटमुळे आग लागली.या आगीत घरातील धान्य, कपडे व रोख असे नुकसान झाले. याबाबत प्राप्त माहितीनुसार बेबी इंगळे ही महिला २५ रोजी सकाळी तिच्या मुलीसह मजुरीच्या कामावर गेली होती तिच्या घरावरुन मुख्य सव्हर्ीेस लाईनचे विजेचे तार गेलेले आहेत. सदर तारेचा घराच्या टिनाला स्पर्श झाल्याने शॉटसर्किट होऊन घराला आग लागली.या आगीत घरातील अन्न धान्यासह कपडे, साडया, रोख रुपये आदी साहित्याची आगीत राखरांगोळी झाली आहे.
रिसोडात शॉर्टसर्किटमुळे घराला आग
By admin | Updated: June 27, 2014 01:45 IST