वाशिम : राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील शेकडो गुरुदेवसेवकांसह आठ सामाजिक संघटना व जनसामान्यांनी आक्रमक होत ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.या एकदिवशीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून गुरुदेव सेवकांनी निवासी जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाला आपल्या मागणीबाबत निवेदन सादर केले. या निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र समरात अनेकांनी उडी घेतली. एवढेच काय, स्वातंत्र्योत्तर काळात देशाचा राज्यकारभार हाकणारे वंदनीय तुकडोजी महाराजांचा अनेक निर्णयात सल्ला घेत. भारताच्या प्रथम राष्ट्रपतींनी वंदनीय तुकडोजी महाराजांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रसंतांची पदवी बहाल केली. ही पदवी बहाल केली असली तरी देशाच्या थोर पुरुषांच्या यादीत मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा समावेश केला गेला नाही. त्यामुळे शासनाच्या या भूमिकेप्रती राष्ट्रसंतांच्या सेवकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. निवासी जिल्हाधिकार्यांना राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचारांना अनुसरून गुरुदेव सेवकांनी निवासी जिल्हाधिकारी देशमुख यांना ग्रामगीताही भेट दिली.
गुरुदेव सेवक झाले आक्रमक
By admin | Updated: September 12, 2014 01:48 IST