दिवाकर इंगोले /कारंजा येथील माळीपुर्यात आठव्या शतकापूर्वीची गणपतीची मुर्ती आहे. उत्तरमुखी असलेल्या या प्राचीन मंदिराची पडझड झालेली असली तरी तिच्या पुरातन वैभवाच्या पाऊलखुना मात्र कायम आहे.कमला केळकर यांच्या विदर्भातील प्राचिन मुर्ती या ग्रंथात पृष्ठ क्र. ९२ वर या मंदिराचा उल्लेख आहे. त्यानूसार या मंदिर उभारणीचा कालखंड इ.स. ४0१ ते ८00 असा आहे. आज गजाननास अग्रपुजेचा मान आहे. पण त्या कालखंडात एवढी लोकप्रियता नसावी. त्यामुळेच कारंजा लाड शहरात एकमेव मुर्ती या कालखंडातील असावी असा ग्रंथात उल्लेख आहे. स्कंदपुराणात या मुर्ती संबंधीचा उल्लेखा येतो. गणेशाची ही प्रतिमा चतुर्भज आहे. प्रदक्षिणाक्रमाने पारा, मुळा, फळ आणि अंकुश अशी आयुधे आहेत. पायाजवळ डावीकडे गणपतीचे वाहन मुषक आहे. चौकानी व्यासपिठावर ही मुर्ती आसनस्थ आहे. तिने निमुळता उंच मुकुट धारण केलेला आहे. ही मुर्ती उत्तरमुखी असल्याने उत्तर भारतातील गुप्त सत्तेचा कलाकृतीचा प्रभाव जाणवतो. पंधरा फुट लांबी रुंदी व दार अडीच बाय पाच चार स्तंभावर मंदिर उभे आहे. हेमांडपंथी विटाने असून कळस व शिर्ष भाग पुरातन पध्दतीने बांधलेला आहे. पुरातन मुर्तीकलेचा हा उत्तम नमुना असून विदर्भातील प्रथम उभारलेल्या गणपती मंदिरापैकी हे एक आहे. अशी संदर्भ माहिती इन्नाणी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.ठकसेन राजगुरे यांनी दिली आहे.
स्कंधपुराणकालीन कारंजातील गणेश मंदिर
By admin | Updated: September 7, 2014 22:47 IST