कारंजा लाड : येथील तालुका क्रीडा संकुलाच्या परिसरात उभारण्यात येणार्या गॅलरीचे काम मागील १0 महिन्यांपासून बंद पडल्याने खेळाडू व क्रीडाप्रेमींची गैरसोय होत आहे.येथील तालुका क्रीडा संकुल परिसरात ह्यबॅडमिंटनह्ण खेळासाठी दोन मैदाने आहेत; पण खेळाडूंसाठी तथा क्रीडाप्रेमींना बसण्यासाठी ह्यगॅलरीह्ण नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. म्हणून ह्यबॅडमिंटन कोर्टह्ण शेजारी ह्यगॅलरीह्ण उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. सदर प्रस्तावाला मंजुरात प्राप्त झाल्यानंतर बांधकामाच्या नकाशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्यबॅडमिंटन कोर्टह्ण शेजारी दोन ह्यगॅलरीह्ण उभारण्याच्या कामाला सुरुवात केली. जवळपास १२ ते १४ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या ह्यगॅलरीह्णच्या मागील भागात मुले व मुलींसाठी स्वतंत्र ह्यचेंजिंग रूमह्ण ही काढण्यात आली; मात्र काम अंतिम टप्प्यात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने १0 महिन्यापूर्वी ह्यगॅलरीह्ण उभारणीच्या कामाला ह्यब्रेकह्ण दिला आहे. त्यामुळे खेळाडू व क्रीडाप्रेमींची गैरसोय होत आहे. ह्यगॅलरीह्णच्या मागील बाजूने बांधण्यात आलेल्या दोन्ही ह्यचेंजिंग रूमह्ण मागील १0 महिन्यांपासून उघड्या असल्यामुळे तेथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुका क्रीडा अधिकारी पद रिक्त असल्याने ह्यगॅलरीह्ण उभारणीच्या कामात तांत्रिक अडचणीमुळे काम रखडल्याचे सांगीतले.
क्रीडा संकुलातील गॅलरीचे काम रखडले
By admin | Updated: September 19, 2014 01:25 IST