रिसोड : येथील लोणी रस्त्यावरील अँन्टी करप्शन अँन्ड क्राईम इव्हीस्टीगेशन फ्रन्टच्या नावाखाली कार्यालय उघडून खंडणी वसुलीचा गोरखधंदा करणार्या दोन आरोपींच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. रिसोड पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला होता. ३१ ऑगस्ट रोजी या दोन आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना न्यायालयात हजर केले असता, विद्यमान न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले. रिसोड शहरातून जाणार्या लोणी मार्गावर ऑल इंडिया वर्किंग ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत अँन्टी करप्शन अँन्ड क्राईम इव्हीस्टीगेशन फ्रन्टच्या नावाखाली भ्रष्टाचार निर्मूलन आणि अपराध अनुसंधान फ्रन्टचे कार्यालय उघडण्यात आले होते. ह्यअब होंगा इन्साफह्ण म्हणत सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयाच्या पदाधिकार्यांनीच खंडणीचा गोरखधंदा सुरू केल्याच्या तोंडी तक्रारी रिसोड पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या कार्यालयातील उपाध्यक्षाने खंडणीची मागणी केल्याची तक्रार २९ ऑगस्ट रोजी चहा पावडरचे ठोक विक्रेते मो. मुनवर शेख यांनी दिल्यावरून ठाणेदार सुरेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला आणि संबंधित कार्यालयातील राजेश वामनराव लोहटे ऊर्फ राजू पाटील व मो. सरफराज या दोघांना अटक केली होती.
खंडणीबहाद्दरांच्या पोलिस कोठडीत वाढ
By admin | Updated: September 1, 2014 00:41 IST