वाशिम : जिल्ह्यात स्त्री भू्रण हत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी संबंधित यंत्रणेला शनिवारी, १९ डिसेंबर रोजी संबंधितांना केल्या.जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे १९ डिसेंबर रोजी पीसीपीएनडीटी व एमटीपी कार्यक्रमांगतर्गत आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. मधुकर राठोड होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे, डॉ. बंग, डॉ. हेडाऊ, अॅड. गंगावणे, अॅड. माधुरी वायचाळ, सल्लागार समिती सदस्य डॉ. अलका मकासरे, सोनाली ठाकूर, डॉ. बिबेकर, आसावा आदींची उपस्थिती होती. अॅड. गंगावणे यांनी पीसीपीएनडीटी कायद्यासंदर्भातील सुधारीत नियम, सोनोग्राफी सेंटर व एमटीपी सेंटर कशाप्रकारे तपासावे, पंचनामा कसा तयार करावा, रेकॉर्ड कसे जतन करावे याबद्दल मार्गदर्शन केले. अॅड. माधुरी वायचाळ यांनी गर्भपात कायद्याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. कावरखे यांनीदेखील मार्गदर्शन केले. डॉ. मधुकर राठोड यांनी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत रिपोर्टींग करणे तसेच सर्व रेकॉर्ड कायदेशीर सांभाळून ठेवणे, जैव वैद्यकीय कचºयाची विल्हेवाट याबाबत मार्गदर्शन करतानाच जिल्ह्यात स्त्री भू्रण हत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी अधिपरिचारिका मीना संगेवार, ललिता घुगे, भोसले, अॅड. राधा नरवलिया, राहुल कसादे, ओम राऊत यांच्यासह कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 18:41 IST