शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

कोरड्या दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 7, 2014 23:44 IST

धरणात अत्यल्प जलसाठा

मालेगाव: जुन महिना संपून जुलै चा पहिला आठवडा संपत आला तरीही पावसाने अद्यापही आपली हजेरी न लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. मागील वर्षी संततधार पावसामुळे खरिप हंगाम भुईसपाट झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी रब्बीच्या पिकात वाढ केली मात्र रब्बीचही पिके गेली निसर्गाच्या अवकृपेने शेतकर्‍यांच्या स्वप्नावरच पाणी फेरल्या गेले. यावर्षी पावसाच्या सरीच पाहायला न मिळाल्याने पावसाळा लागली नसल्याचे वातावरण तयार झाली आहे. शेतकरी जोरदार पाऊस कधी पडेल याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मृग नक्षत्र कोरडा गेल्याने आता आद्रा संपत आला असून पाऊस आता तरी पडेल काय? याची प्रतिक्षा शेतकरी करत आहे.मालेगाव तालुक्यातील जुन २0१३ पासून मागील पावसाळयापासून पावसाची सरासरी पाहता ती कमीच होणारी आहे. जुन २0१३ महिन्यात ४४२.३0 टक्के पाऊस पडला. जुलै २0१३ ला २७0.२0 टक्के ऑगस्ट महिना २४८.२0 टक्के, सप्टेंबर महिन्यात १६३.८0 टक्के, ऑक्टोबर बहिन्यात ८0.0५, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, कोरडाच राहला. फेब्रुवारी २0१४ मध्ये ७.४0 टक्क्े, मार्च २0१४ मध्ये ५८ टक्के, एप्रिल महिन्यात ७ टक्के, मे कोरडा राहला जून १४ मध्ये ७९.0७ टक्के, पाऊस पडला. अद्यापही पेरणी योग्य पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.तालुक्यातील धरणात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील जलसाठा शेती सिंचनामुळे कमी झाला असून व पाऊस ही दडी मारुन बसल्याने जलसाठयात अत्यल्प जलसाठा उरलेला आहे. तालुक्यात कुरळा धरणात 0.६७ दलघमी पाणी उरले असून केवळ २२.१९ टक्के साठा शिल्लक आहे. सुदी संग्राहक तलावात 0.६६ दलघमी पाणी उरले असून केवळ ४४.८९ टक्के साठा शिल्लक आहे. चोरद तलावात १.0४ दलघमी जलसाठा असून ४६ टक्के पाणी शिल्लक आहे. चाकातिर्थ मध्ये २.८९ दलघमी साठा असून ८.२0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर मालेगाव कोळी, कोल्ही, कळमेश्‍वर, सुकांडा, सोनखास, मसला, मुंगळा, डव्हा येथील बिलो ऐलीयशन वर आहेत तर रिधोरा, ब्राम्हणवाडा, कोल्ही हे कारेडा पडला आहेत. त्यामुळे आसपासचे नागरिक चिंताग्रस्त झाले आहे.