शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

मंगळवारपासून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाची धूम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 16:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांचे महत्व पटवून देण्यासाठी ११ आॅगस्टपासून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचा प्रारंभ होणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांचे महत्व पटवून देण्यासाठी ११ आॅगस्टपासून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक असतात तसेच या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी केली जात नाही, त्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर आवश्यक आहे. शहरी भागात राहणाºया नागरिकांमध्ये याबाबत जागृती व्हावी, यासाठी जिल्ह्याचे व तालुक्याचे ठिकाणी ‘रानभाजी महोत्सव २०२०’ साजरा करण्याचे निर्देश  कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात ११ ते १५ आॅगस्ट या कालावधीत तालुकास्तरावर तर १५ आॅगस्ट रोजी वाशिम तालुका व जिल्हास्तरीय ‘रानभाजी महोत्सव २०२०’ महोत्सव होणार आहे, अशी माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांनी दिली.रानभाजी महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला अन्न सुरक्षा गट, महिला बचत गट, उद्योजक शेतकºयांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात आली. शेतकºयांनी रानभाजी महोत्सवात आपल्याकडील उपलब्ध असलेल्या रानभाज्यांच्या नोंदणीकरिता तसेच त्याचे विविध पाककृती, प्रक्रियायुक्त पदार्थ यांची नोंदणी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील तालुका अथवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यनवस्थापक यांच्याकडे करावी लागणार आहे. यासाठी कृषी विभागाने संबंधित संपर्क अधिकाºयांची यादीही जाहिर केली. वाशिम तालुका व जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवासाठी जयप्रकाश लव्हाळे, रिसोड तालुकास्तरीय महोत्सवासाठी मयुर शिरभाते, मालेगाव तालुका सचिन इंगोले, मंगरूळपीर तालुका विजय दुधे, कारंजा व मानोरा तालुकास्तरीय महोत्सवासाठी प्रतिक राऊत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तोटावार यांनी केले.रानभाजी महोत्सव ‘कोविड-१९’ च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन पार पाडावयाचा आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ‘आॅनलाईन’ पद्धतीने कार्यक्रमाच्या दिवशी करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र