किन्हीराजा: एरंडा येथून किन्हीराजा गावामडे ओमनी कारने येत असतांना कुक्कुड पालन केंद्राजवळील पुलाजवळ ओमीनी कारवरील नियंत्रण सूटून ओमनी सरळ नाल्यात आदळल्यामुळे कारमधील किन्हीराजातील एक इसम बाहेर फेकला गेला व ओमिनी गाडीच त्याच्या अंगावर चढल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार ६ जुलै च्या रात्री १0.३0 ते ११ वाजताच्या सुमारास घडली.किन्हीराजा येथील विजय सोनुने हे गेल्या ४0 वर्षापासून गावातील तलाठी कार्यालयात येणार्या तलाठी व गोरगरीब नागरिकांना मदत करणारे ४0 वष्रे वयाचे विजय सोनुने मुळचे अकोला गाव असलेले तलाठी धनंजय राऊत यांना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी एम.एच.३0 ए.ए.१६३८ क्रमांकाची ओमनी कारमध्ये ड्रायव्हर गौतम तेलगोटे, सदिप पांडे यांच्यासह अकोला येथो गेले होते. अकोल्यावरुन परत येताच मुळ गाव एरंडज्ञ येथे असलेले तलाठी संदिप पांडे यांना घरी सोडण्यासाठी एरंडा येथे गेले. पांडेंना सोडल्यानंतर ओमनी कारमधून चालक गौतम तेलगोटे सोबत विजय सोनुने किन्हीराजाकडे निघाले. मात्र एरंडा पासून एक किलोमिटर अंतरावर कुक्कुटपालन केंद्रा जवळील पुलाच्या नालीच गाडी आदळली. याच वेळी समोरच्या सिटवर बसलेले सोनुने हे गाडीबाहेर फेकल्या गेले व ओमनी कार त्यांच्या अंगावर जोरात आदळली. या अपघातात विजय सोनुने यांचा जागीच मृत्यू झाला. कुकुटपालन जवळील युवक धावपळ करीत घटनास्थळी आले मात्र तो पर्यंत सर्वकाही आटोपले होते. या अपघाताच्या घटनेनंतर कारचालक गौतम तेलगोटे घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेचे वृत्त कळताच जमादार कैलास राठोड, पो.कॉ.विजय राठोड यांनी घटनास्थळ पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशिमला नेण्याची सोय केली. पसार कार चालकाचा शोध पोलिस घेत असून लवकरच त्यांच्यावर योग्य कारवाई करु अशी माहिती ठाणेदार प्यारसिंग मालवनी यांनी दिली.
ओमनीच्या अपघातात एकाजणाचा जागीच मृत्यू
By admin | Updated: July 7, 2014 23:54 IST