जानेवारी महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला. एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद रविवारी घेण्यात आली. दरम्यान, रविवारी २२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील जुनी आययुडीपी येथील ५, पाटणी चौक येथील १, सिव्हिल लाईन्स येथील ४, केकतउमरा येथील १, रिसोड शहरातील १, एकलासपूर येथील १, शेलगाव राजगुरे येथील १, मालेगाव शहरातील १, डोंगरकिन्ही येथील २, मंगरुळपीर शहरातील २, कोठारी येथील १, मानोरा शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर एका कोरोना बाधिताची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता ७,१४४वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६,८३६ जणांनी कोरोनावर मात केली, तर १५४ जणांचा मृत्यू झाला.
००
१५३ जणांवर उपचार
आतापर्यंत ७,१४४ जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,८३६ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.