शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

धोकादायक इमारती अद्याप उभ्याच

By admin | Updated: July 12, 2014 23:05 IST

पालिकेची भूमिका बोटचेपी

वाशिम : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात पालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात १९ इतारती धोकादायक असल्याची धक्कादायक माहीती समोर आली हाती. त्यानंतर पालिकेने या इमारतींच्या मालकांना नोटीस देऊन इमारत पाडण्यासाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, १५ दिवस तर सोडाच परंतु तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटला असला तरी, या जीवघेण्या इमारती उभ्याच आहेत. विशेष म्हणजे पालिकेनेही दिलेली डेटलाईन संपल्यानंतर काहीच कारवाई केली नाही. यावरून पालीकेची बोटचेपी भूमिकेवर शिक्कामोर्तब होत आहे. दरवर्षी पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी वाशिम शहरातील धोकादायक इमारती, पाणी तुंबण्याचे ठिकाणे, व नैसर्गिक आपत्तीला कारणीभुत असणार्‍या बाबींचे नगर पालिकेकडुन सर्व्हेक्षण करण्यात येते. यंदाही गत दोन महिन्यापूवी पालिकेने धोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण आटोपले. त्यांनतर सदर इमारतींच्या मालकांना नोटीसही दिल्या. १५ दिवसात या इमारतींची दुरूस्ती करावी अथवा त्या जमिनदोस्त कराव्या असा अल्टीमेटम या नोटीसमधून दिला. मात्र नोटीस देऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही पालिकेने कारवाईची भूमिका घेतली नाही. यातून पालिका त्यांना अभय देत आहे असे म्हणण्याची पाळी आली आहे.** शासकीय इमारतींचाही समावेशपालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणानंतर शहरातील १९ धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत. पावसाळा संपण्यापूर्वी या इमारती दुरूस्त करा, अन्यथा जमिनदोस्त करा अश्या सुचना सदर नोटीसमधून देण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नगर पालिकेच्या सर्व्हेक्षणात एकाही शासकीय इमारतींची धोकादायक म्हणून नोंद केलेली नाही. वास्तविक शासनाच्या अनेक इमारती आज क्षतीग्रस्त झालेल्या असुन अनेकांचे आयुष्यच संपलेले आहे.** शहरवासीयांच्या तक्रारीही बेदखलधोकादायक इमारतींमुळे आमचे जीवनमान धोक्यात आल्याच्या तक्रारी या इमारतींच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांकडे केल्या आहेत. मात्र पालिका प्रशासनाला या तक्रारींची दखल घ्यावी वाटत नाही. सुभाष चौकात राहणार्‍या रमनलाल सुराण यांची तक्रार याबाबत बोलकी आहे. त्यांनी विजय रंगभाळ यांच्या धोकादाकय इमारतीमुळे आमच्या जीवीतास धोका निर्माण झाल्याचे तक्रारी म्हटले होते. परंतु ही तक्रार केराच्या टोपलीतच पडली .** दप्तरात १९ ची नोंद प्रत्यक्ष आकडा मोठापालिकेने सुरू केलेल्या सर्व्हेक्षणा शहरातील धोकादायक इमारतींची संख्या केवळ १९ असली तरी प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा कितीतरी पट मोठा आहे. शहरातील आयुडीपी, लाखाळा, नविन आयुडीपी आदी परसिरातील बांधकाम नविन असले तरी जुने शहर, सिव्हील लाईन आदी ठिकाणी शेकडो वर्षापासूनच्या इमारती उभ्या आहेत. मात्र, यंदा प्रथमच सर्व्हे करणार्‍या नगर पालिका प्रशासनाने काही दबावापोटी बर्‍याच इमारतींचा धोकादायकच्या यादीतील समावेश टाळला आहे