शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

सर्वच पक्षीय नेत्यांची ‘पत’ आली उघडकीस

By admin | Updated: May 22, 2014 23:38 IST

मानोरा तालुक्यात काँग्रेसची सरशी

मानोरा: यवतमाळ- वाशिम लोकसभा निवडणुकीत मानोरा तालुक्यात १३३ मतदान केंद्रावर मतदान झाले. काही केंद्रावर सेनेची सरशी तर काही केंद्रावर काँग्रेसची सरशी आहे. पण, एकूण मानोरा तालुक्यात काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांनी ८८८६ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे तालुक्यातील नेत्यांची किती ह्यपतह्ण आहे हे उघड झाले. कारंजा विधानसभा मतदार संघात ३१७ मतदान केंद्रापैकी मानोरा तालुक्यात १३३ मतदान केंद्र होती. शहरात ५ मतदान केंद्रावर मतदान झाले पण मानोरा-४ मतदान केंद्रावर फक्त १६१ मतांनी भावना गवळी आघाडीवर आहेत. पण,शहरातील ५ केंद्राचा विचार केला तर सेना माघारली आहे. काँग्रेसचे शिवाजीराव मोघे ४१९ मतांची सरशी घेतली. एकंदरीत सेनेची लाट असताना काँग्रेसचा प्रभाव प्रखरतेने दिसून आला आहे. मतदार संघातील मानोरा तालुक्यात १३३ बूथ आहेत. त्यामध्ये भावना गवळी यांना ५२ बूथमध्ये आघाडीवर आहेत तर ८१ बूथमध्ये शिवाजीराव मोघे यांना आघाडी आहे. मतदानाची आकडेवारी लक्षात घेता मराठा प्राबल्य असलेल्या गावामध्ये भावना गवळी यांना आघाडी मिळाल्याचे दिसते. म्हसणी, इंझोरी, अजनी, दापुरा खुर्द, दापुरा बु., भोयणी, चोंढी, कुपटा, हिवरा बु., बोरव्हा बु., हळदा, कोंडोली, तळप, धामणी, आमगाव, सोमठाणा, विठोली, धानोरा, हातोली, उमरी, रणजीतनगर, वाईगौळ, आसोला या गावामध्ये गवळी पुढे आहेत. बंजारा बहुल वाईगौळ, सोमनाथनगर, हळदा, ज्योतीबानगर, बंजारा बहुल गावामध्ये सेनेने आघाडी घेतली. मोघे यांचे खरे सर्मथक माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या पोहरादेवी गावात सेनेने चांगली मते घेतली आहेत. मोघेंना येथे फक्त १४ मतांची आघाडी मिळाली. येथे जि.प.सदस्यही काँग्रेसचाच आहे.माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड यांच्या वाईगौळमध्ये सेनेची सरशी आहे. येथील पं.स. चे पराभूत उमेदवार उमेश राठोड यांनी येथे काँग्रेसपेक्षा जास्त मते घेतली होती. दोन्ही गट सेनेच्या सोबत होती.या गावात शिवसेनेला मिळाली असलीतरी मोघेंना मिळालेली मते प्रत्यक्ष त्यांना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांचे खंदे सर्मथक सुधीर राऊत यांच्या इंझोरी सर्कलमध्ये सेनेने .आघाडी घेतली. या सर्कलमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.मात्र, सहकार नेते सुरेश गावंडे यांच्या रामतीर्थ गावात मोघे आघाडीवर आहेत. भुली येथे दोन केंद्रापैकी एका केंद्रावर मोघे आघाडीवर आहेत. हे गाव राकॉ सर्मथक पंचायत समिती सदस्य अशोक चव्हाण यांचे आहे. आ.डहाके यांचे खंदेसर्मथक तांडा वस्ती सुधार योजनेचे सदस्य भाऊ नाईक यांच्या भोयणी गावात सेनेला आघाडी आहे. एकंदरीत तालुक्याचा विचार केला तर येथे माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, आ.प्रकाश डहाके यांचा बोलबाला असताना मोघेंना मोठी आघाडी मिळावयास पाहिजे होती. कारण प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची फौज होती.पण असे असूनही या नेत्यांच्या गावात कॉग्रेसला आघाडी न मिळाल्याने काँेग्रेसची ह्यपतह्ण राहिली नाही. सेनेने डिसेंबर १३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जि.प.च्या एकुण आठ जागांपैकी पैकी तीन जि.प. मतदारसंघात आणि चार पं.स.मतदारसंघात सेनेने बाजी मारली. सध्या तालुक्यात शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवि पवार, जि.प.सदस्य रणजीत जाधव, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड आदी राजकारणात सक्रीय आहेत.शिवसेनेकडे कार्यकर्त्यांची फळी असताना आणि भारतभर मोदींची त्सुनामी लाट असताना मानोरा तालुक्यात सेनेने मागे राहणे हे चिंतनीय आहे

. ** इतर उमेदवारांना काही गावात एकही मत मिळाले नाही

मानोरा तालुक्यात मनसेचे राजू पाटील राजे यांना ५0 च्या वर मते मिळाली नाहीत. त्यांना सहा केंद्रावर शून्य मते मिळाली असून तालुक्यात मनसेला एकूण ११२३ मते मिळाली आहेत. बसपाचे बळीराम राठोड यांना दोन केंद्रावर शून्य मतदान झाले असून त्यांना तालुक्यात २३0२ मते मिळाली. एकंदरीत प्रत्येक निवडणुकीत तालुक्यात काँग्रेसला बहुमत असते. त्यामुळे सेना-भाजपा पदाधिकार्‍यांनी पक्षबांधणी नव्या रूपाने करणे गरजेचे आहे. मधल्या फळीतील कार्यकर्त्यांना आता संधी द्यावी असे वतरुळात बोलले जात आहे.