शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

ग्रामपंचायत निवडणुकीत १४६० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी; अहवाल प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:17 IST

Gram Panchayat elections एकूण ३ हजार जणांची कोरोना चाचणी ९ जानेवारीपासून केली जात आहे.

ठळक मुद्देरविवारपर्यंत १,४६० जणांची चाचणी करण्यात आली.एक किंवा दोन दिवसात अहवाल येण्याचा अंदाज आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मतदान प्रक्रियेतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून मतदान केंद्रात नियुक्त ३ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. रविवार, १० जानेवारीपर्यंत १,४६० जणांची चाचणी झाली असून, एक किंवा दोन दिवसात अहवाल येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. कोरोनाचा आलेख खाली आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास ७०० मतदान केंद्रे असून एका केंद्रावर प्रत्येकी चार अधिकारी, कर्मचारी व अतिरिक्त २०० अधिकारी, कर्मचारी, असे एकूण ३ हजार जणांची कोरोना चाचणी ९ जानेवारीपासून केली जात आहे. रविवारपर्यंत १,४६० जणांची चाचणी करण्यात आली.

१३ जानेवारीपर्यंत उमेदवारांची चाचणीजिल्ह्यातील २५२ सदस्य अविरोध झाल्याने उर्वरित १,२३५ जागांसाठी निवडणूक होत आहे. १,२३५ जागांसाठी ३,२२६ उमेदवार नशीब आजमावत असून, या उमेदवारांनी १० ते १३ जानेवारीपर्यंत कोरोना चाचणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मतदान तसेच मतमोजणीच्या दिवशी उमेदवारांनी कोरोना चाचणीचा अहवाल दाखविणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जाणार काळजीमतदान व मतमोजणीच्या प्रक्रियेतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. उमेदवार व मतदान केंद्रातील प्रतिनिधींनीदेखील कोरोना चाचणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मतदानाच्या दिवशी केंद्रात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या मतदाराला मतदान करता यावे म्हणून पीपीइ किट व आवश्यक ती काळजी घेतल्यानंतरच सर्वात शेवटी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या