अनसिंग (जि. वाशिम) : किरकोळ वादातून एका जणाला शिवीगाळ करून लाकडी काठीने डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना टनका येथे २९ जुलैला सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनसिंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टनका येथील प्रभू नाथ खाडे (३५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी प्रवेश सुभाष भगत यांनी घरासमोरून जात असताना फिर्यादीला शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण करून गंभीर केले. यावरून अनसिंगचे ठाणेदार डी.एम. घुगे यांनी भादंविच्या कलम ३२४, ५0४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास जमादार विजय घुगे करीत आहेत.
मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: July 31, 2015 01:02 IST