वाशिम : जिल्ह्यात आणखी १५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २ फेब्रुवारी रोजी ‘पॉझिटिव्ह’ आला. एकूण बाधितांची संख्या ७,१६९ वर पोहोचली आहे. दरम्यान, मंगळवारी १२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
अलीकडच्या काळात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. मंगळवारी, १५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील गव्हाणकरनगर येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, सिव्हिल लाईन्स परिसरातील १, माऊंट कार्मेल स्कूल परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, तांदळी बु. येथील २, सावरगाव बर्डे येथील १, कोंडाळा झामरे येथील १, मंगरुळपीर शहरातील १, रिसोड शहरातील शिवाजीनगर येथील १, कंकरवाडी येथील २, रिठद येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी आरोग्य विभागातर्फे केली जात आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,१६९ वर पोहोचला आहे. मंगळवारी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ६,८७१ जणांनी कोरोनावर मात केली.
००
१४३ जणांवर उपचार
आतापर्यंत ७,१६९ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,८७१ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.