लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील वाशिम वगळता पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी सोमवार ११ सप्टेंबरपासून सुरू असलेले हे आंदोलन गुरुवार १४ सप्टेंबर रोजी चौथ्या दिवशीही सुरू होते. या दिवशी अंगणवाडी सेविकांनी वाशिम जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करीत विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका कर्मचारी कृती समितीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचार्यांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्यांचा समावेश आहे. अंगणवाडी कर्मचार्यांच्या संपामुळे अंगणवाडी केंद्रांतील बालकांना पोषण आहार वितरण बंद आहे. दिल्ली, केवळ, बेंगळुरू, तामिळनाडू, पाँडेचेरी राज्यांनी अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधन, वेतनात बर्यापैकी वाढ केली. महाराष्ट्र सरकारनेही सेविका, मदतनीसांच्या वेतनवाढीचा निर्णय घ्यावा, सेवानवृत्तीनंतर लाभाची रक्कम २ लाख करावी, टीएचआर बंद करावा, मिनी अंगणवाडी केंद्रे पूर्ण केंद्रात रूपांतरित करावे, अंगणवाड्यांची स्टेशनरी, रजिस्टर, अहवाल व इतर साहित्य सरकारने पुरवावी, दरमहा १ तारखेपर्यंत मानधन द्यावे, अंगणवाड्यांचे खासगीकरण करू नये, आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात थाळीनाद आंदोलन करून त्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या थाळीनाद आंदोलनाचे नेतृत्व मंगला सराफ, कौशल्य बेलखेडे, रंजना सुद्रिक, चंद्रकला तायडे, राजू लोखंडे, प्रमिला पखाले, भारती इंगळे, वर्षा भुते, रेखा शिंदे, श्रृती कभळे, ज्योत्स्ना वैद्य आणि आशा चव्हाण यांनी केले.-
अंगणवाडी सेविकांचा थाळी नाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:53 IST
विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील वाशिम वगळता पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी सोमवार ११ सप्टेंबरपासून सुरू असलेले हे आंदोलन गुरुवार १४ सप्टेंबर रोजी चौथ्या दिवशीही सुरू होते. या दिवशी अंगणवाडी सेविकांनी वाशिम जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करीत विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका कर्मचारी कृती समितीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
अंगणवाडी सेविकांचा थाळी नाद!
ठळक मुद्देसंपाचा चौथा दिवसविविध प्रश्न निकाली काढण्याची मागणी