शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

कृषी सहाय्यकांच्या नशिबी खस्ताच!

By admin | Updated: July 12, 2014 02:11 IST

तांत्रिक वेतनश्रेणी देतेय हुलकावणी: शासनाचे दुर्लक्ष

नागेश घोपे / वाशिमशेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची धुरा अखंडपणे वाहणार्‍या कृषी सहाय्यकांच्या नशिबी अद्यापही खस्ताच लिहीलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम अथवा लघुसिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांपेक्षाही किचकट तांत्रिक कामे कृषी सहाय्यकांना करावी लागतात. तथापि, त्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागु करताना मात्र, शासनाने आखडता हात घेतला आहे.कृषी सहाय्यक शेतकरी व कृषी विभाग यांच्यातील ह्यसेतूह्ण मानल्या जातो. कृषी विभागाच्या वतीने शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांच्या अंमलबजावणीतही कृषी सहाय्यकांचा वाटा मोठा असतो. कृषी क्षेत्रात विकसीत होणार्‍या विविध तंत्रज्ञानाची शेतकर्‍यांशी सांगड घालुण देणे, शे तकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करणे आदी कामांची धुराही याच प्रवर्गाच्या खांद्यावर असते. रोजगार हमी योजना, विदर्भ सिंचन योजना, एकात्मिक पणलोट व्यवस्थापण, गांढूळ खत प्रकल्प निर्मिती योजना, गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम, जलसंधारण व मृदसंधारणाच्या कामे पुर्ण करणे, त्यांचे अंदाजपत्रक तयार करणे आदी तांत्रिक स्वरूपाची कामेही कृषी सहाय्यकांना करावी लागतात. परंतु वेतनश्रेणीच्या बाबतीत हा प्रवर्ग दुर्लक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा लघुसिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना लागु असलेली तांत्रिक वेतनश्रेणी मिळण्यात यावी, यासाठी रितसर निवेदनेही दिली होती. परतु याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. कृषी सहाय्यकांप्रमाणेच मंडळ कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी व उपाविभागीय अधिकार्‍यानाही या तांत्रिक वेतनश्रेणीची प्रतिक्षा आहे.कृषी सहाय्यकांचे पद निर्मिती *१९४२ मध्ये जमिनीतील धूप कमी करण्यासाठी एका अधिकार्‍याने शासनाचा निधी व लोकवर्गणी असा तब्बल १0 लाखांचा निधी गोळा करून मृदसंधारणाची योजना अंमलात आणली होती. प्रंचड मेहनत व नियोजनातून ही योजना अयशस्वी झाली, तेव्हापासूनच इंग्रज राजवटीत कृषी सहाय्यकांचे पद निर्माण झाले होते. कालांतराने त्यांच्यावरील कामाचा ताण वाढतच गेला.तांत्रिक वेतनश्रेणीची मागणी कशामुळे ?कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे असलेली कामे बहुधा तांत्रिक स्वरूपाची आहेत. त्यांना लाभ क्षेत्राबाहेरील जलसंधारणाचे व मृदसंधारणाची कामे व नियोजन कृषी सहाय्यक व इतर अधिकार्‍यांनाच करावे लागतात. अंदाजपत्रके तयार करणे, प्र त्यक्ष काम करून घेणे, मापे घेऊन नोंदी घेणे, मजुरांना पगार अदाकरणे, आदी कामेही कृषी सहाय्याकांना करावी लागतात. तांत्रिक दृष्ट्र्या ही कामे कनिष्ठ अभियंत्यांची आहे. परंतु कनिष्ठ अभियंत्यांना शासनाने तांत्रिक वेतनश्रेणी मंजुर केलेली आहे. त्यामुळे कृषी सहाय्यकांनाही ही तांत्रिक श्रेणी मंजुर करावी असा मतप्रवाह आहे.एका कृषी सहाय्यकाडे तीन गावांचा प्रभारराज्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या गप्पा शासनाकडुन नेहमीच केल्या जातात. शेतकर्‍यांना नवनविन तंत्रज्ञानाची माहीती देण्याचाही शासनाचा नेहमीच प्रयत्न असतो. दुसरीकडे मात्र एका कृषी सहाय्यकाकडे तीन अथवा त्यापेक्षाही अधिक गावांचा प्रभार देऊन शासनाच्या कृषी क्षेत्राचा विकास खुंटविला आहे. राज्यात सद्यस्थितीती ११ हजार ५२४ कृषी सहाय्यक कार्यरत आहेत. तर सुमारे दीड हजार पदे रिक्त आहेत. कृषी सहाय्यकांच्या कमतरतेमुळे कृषी योजनांचा बट्ट्याबोळ होत असल्याचे दिसून येत आहे.राज्यातील कृषीसहाय्यकांची संख्या ११५२४ वाशिम जिल्हा जिल्हा कृषी अधिकक्ष 0१उपविभागीय कृ षी अधिकारी 0१ तालुका कृषी अधिकारी 0६ जिल्हा कृषी सहाय्यक १९६