जव्हार : जव्हार तालुक्यातील काही खेड्यापाड्यांत सर्रास मेनलाइनवर आकडे टाकून विजेचीचोरी केली जाते आहे. मात्र, महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडून कुठलीच कारवाई केली जात नाही. याचे परिणाम लोडशेडिंगच्या रूपात बघावयास मिळतात. खेड्यापाड्यांत ६ ते ८ तास भारनियमन केले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे सायंकाळच्या वेळेस आकडे लावून विद्युतपुरवठा सुरू करून होत असलेली वीजचोरी हे आहे. वितरण विभाग डबघाईस आला असताना अशा वीजचोऱ्यांमुळे महावितरण विभागाचे मोठे नुकसान होत आहे. तरीही, अशा घटनांकडे महावितरणचा एकही अधिकारी लक्ष देता नाहीत कारण त्यांचे या वीजचोरांशी साटेलोटे असावे अशी ही चर्चा आहे. (वार्ताहर)
खेड्यांत सर्रास वीजचोरी
By admin | Updated: August 12, 2015 23:14 IST