विक्रमगड : या परिसरात रविवारी छटपूजा मोठया उत्साहात साजरी करण्यांत आली़ महिलांनी आज उपवास केला. तो आज दिवसभर उपवास राहाणार आहे़ सायंकाळी ४ वाजता पासुन विक्रमगड ते गडदे येथील तांबाडी नदीपर्यत चालत डिज़ेच्या तालावर वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली़ नदीवर यथासांगसमाजाच्या रितीप्रमाणे तिन उसाच्या मौळीमध्ये पूजा मांडून विधीवत पुजा करण्यांत आली़ त्यानंतर दुस-या दिवशी पहाटे ४ वाजता उठून पुन्हा नदीवर जावून पूजा केली जाते त्यानंतर या महिलाचा सुर्योदयानंतर उपवास सुटतो़ व महिलांच्या बरोबर सहकुंटुंबसह परिवार नदीवर पुजेसाठी जात असतांत अशी माहिती येथील रामु चव्हाण, रमेश गुप्ता, अरविंद्र चव्हाण, हिरागुप्ता, कमलेश चव्हाण, आदीनी पत्रकांराना दिली़ दरम्यान हे व्रत स्त्रीयांमध्ये अतिशय पवित्र आणि मांगल्याचे मानले जाते़ या व्रतासाठी अदल्या एक दिवस व दुसरा चंद्र उदय होईपर्यत असे एकुण दोन दिवस उपवास ठेवतात़ या दिवशी स्त्रिया उसाच्या मौळीमध्ये पुजामांडुन पुजाकरुन आपल्या सौभाग्यांच्या दीर्घायुष्याची मागणी देवाजवळ करत असतात़विक्रमगड व परिसरात दरवर्षीया समाजाच्या पारंपारिक पध्दतीने छट पुजा साजरी करण्यांत येते़ नेहमी नोव्हेबरच्या पहिल्या आठवडयामध्येच ही पुजा साजरी होते आज रविवार सुटीचा दिवस असल्याने घाई गडबड न करता यथासांगमनाप्रमाणे पुजा करता आली़ (वार्ताहर)
विक्रमगड तालुक्यात छटपूजा उत्साहात
By admin | Updated: November 7, 2016 02:35 IST