शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
5
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
6
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
7
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
8
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
9
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
10
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
11
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
12
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
13
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
14
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
15
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
16
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
19
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
20
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...

परिवहनच्या बसेस ओकतात धूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 22:54 IST

पर्यावरणाला धोका : प्रशासन, लोकप्रतिनिधी कधी देणार लक्ष?

नालासोपारा : वसई तालुक्यात मोठा गाजावाजा करत परिवहन विभागाने वसई विरार परिसरात बस सेवा सुरु केली. पण या बसेसची हालत फारच खराब व नाजूक आहे. यांच्यावर निंयंत्रण ठेवण्यात मनपा अपयशी ठरली आहे. मनपा परिवहन सेवा देणाऱ्या बस काळाकुट्ट धूर सोडत मोठ्या प्रमाणात प्रदूषण करीत आहे. पर्यावरणाला धोका होऊ नये आणि नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी वसई विरार मनपाने ५ लाख झाडे सर्व तालुक्यात लावली आहे, पण ज्या बसेसच्या विषारी आणि काळ्या धुरामुळे प्रदुषण होत आहे. यावर अंकुश लावण्यात ती अपयशी ठरली आहे. या धुरामुळे पादचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. एकीकडे परिवहन विभाग स्वच्छ आणि सुंदर रस्ते ठेवण्यास सांगते ते या धूराच्याकडे काणाडोळा का करत आहे हा लोकांना प्रश्न पडला आहे?

कायद्यानुसार रस्त्यावर चालणाºया गाड्यांना पीयूसी करणे बंधनकारक आहे आणि पीयूसी नसेल तर दंड भरण्याचाही नियम आहे. या सरकारी बस मधून निघणाºया काळ्या विषारी धूराकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यांच्याकडे पीयूसी सर्टीफिकेट आहे की नाही? याची चौकशी करणेही महत्वाचे आहे. ज्या बस वाल्यांकडे पीयूसी नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही मागणी आता जोर धरु लागली आहे.परिवहन सेवा विभागाचे आणि अधिकाºयांचे दुर्लक्ष असल्यामुळे वसई विभागात परिवहन सेवा देणाºया बहुतांश बसेसची अवस्था फार बिकट आहे. त्यांच्या मधून निघणारा विषारी काळ्या धुराचे लोटच्या लोट रस्त्यावर सोडत आहे. वेळीच लक्ष मनपाने दिले नाही तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रदुषण निर्माण होत आहे.वाहतूक विभागाने या परिवहन सेवा देणाºया बसमधून निघणाºया काळ्या धूरावर उपाय कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. महानगरपालिकेच्या परिवहन बसेस शहरामध्ये प्रदूषण पसरवत आहे याला जवाबदार कोण? परिवहन विभाग, मनपाचे परिवहन अधिकारी की बस चालविणारा ठेकेदार?अनेक बसेसची परिस्थिती खूपच नाजूकवसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन खात्याच्या ताफ्यात १६० बसेस आहे. पण यातील बºयाच बसेसची परिस्थिती सध्या नाजूक आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरत असल्याने बसेस एका साईडला झुकत आहे. या बसेसकडे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी व परिवहन खात्यानेही लक्ष घालणे खूप गरजेचे असून त्यांची दुरु स्तीसह देखभाल करणेही गरजेचे आहे.मनपा हद्दीत बसेस चालवण्याचा ठेका असलेल्या भगिरथी ट्रान्सपोर्टला याबाबत बोलावणार असून प्रदूषणाबाबत सूचना देणार. या विषयाकडे मी जातीने लक्ष घालणार. तसेच किती बसेस धूर फेकत आहेत याची माहिती घेऊन लवकरात लवकर त्या बसेस दुरु स्त करण्यासाठी त्याला आदेश देणार आहे. जेणेकरून पर्यावरणाला धोका होणार नाही. तसेच सर्व बसेसची पियूसी चेक करायला सांगणार.- बळीराम पवार (आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका)ज्या बसेसचा काळा धूर येत असलेलं त्या बसेसचा नंबर द्या जेणेकरून तिची दुरस्ती करता येईल. गाड्या जास्त प्रमाणात चालल्या की त्यांचे एयर फिल्टर जाम होते तर कधी डीझल फिल्टर चोकअप होते त्यावेळी काळा धूर बाहेर फेकला जातो. तशा बसेसचा नंबर दिला तर त्या बसेस वर्कशॉपमध्ये आणून चेक करता येतील.- मनोहर सकपाळ (संचालक, भागिरथी ट्रान्सपोर्ट)भगिरथी ट्रान्सपोर्ट कंपनीवर अनेक आरोप....भगिरथी ट्रान्सपोर्ट कंपनीने वसई विरार शहर महानगरपालिकेत बसची सुविधा देण्यासाठी परिवहनचा ठेका घेतल्यापासून अनेक आरोपामुळे चर्चेत आली आहेत. बस चालकाने केलेले अपघात व त्यामध्ये गेलेले नाहक नागरिकांचे जीव, ताडी पिण्यासाठी बस बाजूला लावून ताडीच्या बाटल्या घेऊन जातानाचे व्हिडीओ या ना त्या आरोपामुळे भगिरथी ट्रान्सपोर्टबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार