शहरं
Join us  
Trending Stories
1
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
2
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
3
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
4
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
6
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
7
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
8
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
9
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
10
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
11
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
12
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
13
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
14
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
15
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
16
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
17
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
18
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
19
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
20
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...

सहा महिन्यांची बिले थकली; अमृत आहार योजनेत निधीची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 05:45 IST

अमृत आहार योजनेसाठीच्या निधीसंदर्भात जिल्हा नियोजन समितीमध्ये कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले.

- हितेन नाईकपालघर : कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या अमृत आहार योजनेसाठी आवश्यक निधीची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा फटका अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणाऱ्या बचत गटांना बसला आहे. कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व महत्त्वाकांक्षी अशा या अमृत आहार योजनेसाठी जिल्हा यंत्रणेला १२ कोटींचा आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असला तरी या योजनेअंतर्गत पोषण आहार पुरविणाºया अंगणवाड्यांना जूनपासून गेले सहा महिने बिले देण्यात आलेली नसल्याची तसेच अंगणवाड्यांमधील बालकांना गरम व ताजा असा आहार पुरवणाºया बचत गटांनाही वर्षभरापासून निधी उपलब्ध झाला नसल्याची बाब उघड झाली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ याची दखल घेत २४ जानेवारीच्या पत्राने ८ कोटींचा निधी महिला बालकल्याण विभागाकडे वर्ग केला असून त्याचे वाटप लवकरच केले जाणार आहे.अमृत आहार योजनेसाठीच्या निधीसंदर्भात जिल्हा नियोजन समितीमध्ये कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले. पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जात असून या जिल्ह्यातील कुपोषित बालकांची तसेच गरोदर व स्तनदा मातांना योग्य पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गरोदरपणात व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर ६ महिने, ७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना एक वेळचा आठवड्यातून ४ दिवस चौरस आहार दिला जातो.जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राज्यपाल नियुक्त सदस्य व कष्टकरी संघटनेचे अ‍ॅड. ब्रायन लोबो यांनी पालकमंत्री दादा भुसे आणि जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली होती. लोबो यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मात्र संबंधित आयसीडीएस विभागाचे अधिकारी देऊ शकले नव्हते. यावर माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त करीत बचत गटातील महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाला हरताळ फासण्याचा हा प्रयत्न असून खाजगी ठेकेदाराला ठेके देण्याचा हा डाव असल्याची शंकाही व्यक्त केली होती. आ. राजेश पाटील, जि.प. सदस्य काशिनाथ चौधरी यांनी अमृत आहार योजनेकडे होणारे दुर्लक्ष ही गंभीर बाब असल्याचे सांगितले.अमृत आहार योजनेसाठी आदिवासी विकास विभागामार्फत २० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तालयातून प्रथम ६ कोटी ६६ लाखाचा निधी तर त्यानंतर दोन महिन्यात ५ कोटी ३३ लाख असा एकूण सुमारे १२ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. मात्र उर्वरित ८ कोटींचा निधी वेळीच मिळत नसल्याने अंगणवाड्यांना मिळणारा आहार आणि हा आहार पुरवणारे बचत गट अडचणीत सापडले होते.फेब्रुवारीच्या आत टप्प्याटप्प्याने निधी वितरित करणारजिल्हाधिकाºयांनी २४ जानेवारी रोजीच्या पत्रान्वये उर्वरित ८ कोटींचा निधी वर्ग केला आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने फेब्रुवारीच्या आत वितरित करण्यात येईल, असे महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जिल्ह्यातील स्तनदा गरोदर मातांना व बालकांना डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना अंतर्गत पोषण आहार पुरविला जातो. २५ रुपये दराने आदिवासी विकास विभाग अमृत आहारासाठी निधी उपलब्ध करून देत असली तरी ही रक्कम अपुरी आहे.अंगणवाडी सेविका व मदतनीस पोषण आहार पुरविण्याचे काम करीत असताना या कामांचा त्यानुसार मोबदलाही दिला जातो. मात्र जिल्ह्यातील अंगणवाड्यांना मागील सहा महिन्यापासून आहार पुरविण्यापोटीचा झालेला खर्च मिळालेला नाही.

टॅग्स :palgharपालघर