- अनिरूद्ध पाटील डहाणू/बोर्डी : डहाणू तालुक्यात रब्बी हंगामातील मिरचीचे क्षेत्र प्रतिवर्षी विस्तारत असून हजार हेक्टरपर्यंत लागवडीचा आकडा पार केला आहे. मात्र, दरवर्षी परतीच्या पावसाचा कालावधी वाढत असल्याने त्याचा फटका या पिकाच्या रोपवाटिकेला बसून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. दरम्यान, घराच्या टेरेसवर नर्सरीचा नावीन्यपूर्ण उपक्रम परिणामकारक ठरत आहे. त्यामुळेच यंदाच्या अवकाळी पावसातही रोपांचे संवर्धन करण्यात त्यामुळे यश आले.तालुक्यात वाणगाव, चिंचणी आणि परिसरातील शेतकºयांनी विविध सोसायट्यांच्या माध्यमातून मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार पेठेत येथील मिरची उत्पादनाचे महत्त्व वाढवले. त्यानंतर किनाºयालगतच्या गावांमध्ये या नगदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली. गेल्या दशकापासून वाणगावसह पंचक्रोशीत ठिबक सिंचनाद्वारे पाणी, खत आणि अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन सुरू केले. यामुळे वेळ, खत, मजुरांवर होणाºया खर्चावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवून आर्थिक फायदा वाढला. त्याचा अवलंब तालुक्यातील अन्य शेतकºयांकडून होतो आहे.तालुका कृषी विभागातील डहाणू, कासा आणि वाणगाव या तीन मंडळात ८५ ग्रामपंचायती अंतर्गत गावांचा समावेश असून सर्वाधिक मिरची लागवड वाणगाव मंडळात केली जाते. हल्ली येथील शेतकºयांकडून अंदाजे ४०० हेक्टरवर शेडनेटद्वारे आधुनिक पद्धतीने सिमला मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. उच्चशिक्षित तरुण वर्गाने प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय स्वीकारला आहे. त्यामुळेच राज्यात मिरची उत्पादनात डहाणू तालुक्याने अव्वल क्रमांक गाठला असून येथील माल परदेशात निर्यात होतो. त्यांचा हा आदर्श तालुक्यातील अन्य शेतकºयांनी घेतला असून आदिवासी तरुणही मिरचीची शेती करू लागले आहेत. अल्पभूधारक शेतकºयांकडून सामूहिक गटशेतीच्या माध्यमातून लागवड करून उत्पन्नाची पातळी वाढवली आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या क्षेत्रावर लागवडीसाठी लागणाºया मिरची रोपांसाठी मोठा शेतकरी वगळता अन्य छोटे शेतकरी पारंपरिक पद्धतीने गादी वाफ्यावर रोपवाटिका करीत होते. दरवर्षी परतीच्या पावसामुळे रोपांचे नुकसान होते. शिवाय जमिनीतील ओलाव्यामुळे बुरशीच्या प्रादुर्भावाने रोपे रोगग्रस्त होतात. उंदीर, घुशी आणि जनावरांकडून त्यांची नासधूस होऊन अनेक रोपे लावण्याआधीच दगावत असल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागते. यासाठी राहत्या घराच्या टेरेसवर मिरची रोपांसाठी नर्सरी करण्याची युक्ती मिरची उत्पादक राबवताना दिसत आहेत.टेरेस नर्सरीचा अभिनव प्रयोगचिखले गावातील शशिकांत रडका जोंधळेकर या ग्रामीण विकास विषयात एम.ए. झालेला प्रगतीशील शेतकरी २० वर्षांपासून रब्बी हंगामातील मिरची शेती करतो. काही वर्षांपासून परतीच्या पावसाचा हंगाम लांबत असल्याने पारंपरिक गादी वाफ्यावरील नर्सरीला फटका बसत आहे तर जमिनीवर ट्रेद्वारे केलेल्या नर्सरीतील १५ ते २० टक्के रोपांची मर होते.यासाठी त्यांनी टेरेस गार्डन या संकल्पनेवर आधारित हा अभिनव उपक्रम राबवला. यंदा अवकळी आणि वादळसदृश स्थितीमुळे झालेल्या पावसामुळेही त्यांच्या या नर्सरीतील शंभर टक्के रोपे जिवंत आहेत. शेतातील कीड आणि जमिनीपासून उंचावर असल्याने रस शोषक किडीचा प्रादुर्भाव टाळता येतो.शिवाय घरच्याघरी नर्सरीची देखभाल करता येते. यासाठी लागणारे बांबू आणि नेट चार ते पाच वर्ष सहज टिकत असल्याने हा प्रकार परवडणारा असून दर्जेदार रोपांसाठी हा उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी शेतकºयांना केले आहे.या प्रकारच्या नर्सरीमुळे पाऊस, वारा, आणि रोगापासून संरक्षण झाल्याने शंभर टक्के रोपांची उगवण झाली आहे. शिवाय रोपांची वाढ जोमाने झाल्याने आगामी उत्पादनही भरघोस असेल. नेट आणि बांबू ४ ते ५ वर्ष टिकत असल्याने त्यावरील गुंतवणूक अल्प असून फायदेशीर आहे. या उपक्रमात कुटुंबातील सदस्यांचीही मदत होते. - शशिकांत जोंधळेकर, प्रगतीशील मिरची उत्पादक
मिरची रोपांसाठी टेरेस नर्सरी; नगदी पिकामुळे उत्पन्नात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:29 IST