शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

रेडिमेड साहित्यामुळे लोहाराचा भाताही थंडावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 23:18 IST

ऐरणीचा देव रुसला; लोहार, सुतारकाम झाले कमी; शेतीतही आता अद्ययावत साधने

- सुनील घरत पारोळ : शेतीच्या कामात आज रेडिमेड साहित्य तसेच यांत्रिक अवजारांचा वापर केला जात असल्याने लोहार, आणि सुतार, व्यवसायाला घरघर लागली असून त्यांना काम मिळत नसल्याने समाजातील तरु ण इतर व्यवसायाकडे वळला आहे.कधीकाळी शेतकऱ्यांचा आवश्यक घटक म्हणून समजल्या जाणाºया लोहार - सुतार समाजावर अलीकडच्या काळात आर्थिक संकट कोसळले आहे. शेती व्यवसायात आलेल्या अत्याधुनिक साहित्यामुळे या समाजाला उपजीविका चालविणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांची शेतीकरिता उपयोगी असलेली अवजारे ही लाकडी असल्यामुळे शेतकºयांच्या दैनंदिन अवजारे बनविण्याकरिता सुतारांसोबत संबंध यायचा.लोखंडी अवजारे बनवण्यासाठी आपल्या छोट्याशा दुकानात चामडी भाता आणि भाता ओढण्यासाठी घरातील महिला किंवा मुलांचे सहकार्य घेत होते. दुकानामध्ये ऐरण, घन, वासला, आरी, किकरा पटास, कानस, सांडशी घेऊन लोहार आपले व्यवसाय करीत होते. व या व्यवसायावरच लोहार-सुतार समाजाच्या पूर्ण कुटुंबाच्या उदरिनवार्हाची जबाबदारी होती. मात्र, यांत्रिक युगामध्ये लोहाराच्या धंद्याला अवकळा आली असून त्यांचा धंदा पावसाळ्यापुरताच मर्यादित राहिला आहे.पावसाळ्यात शेतकºयांना शेतीची अवजारे, वखराचा लोखंडी विळे, कुºहाड, कुदळ, विळे पाजविणे एवढेच मर्यादित राहिल्याने तसेच बाजारामध्ये शेतकºयांची सर्व अवजारे रेडीमेड मिळत असल्यामुळे लोहाराचा मुख्य धंदा बंद होण्याच्या मार्गावर आहे.आता यांत्रिक युगामध्ये शेतकºयांची बैलगाडी हद्दपार होण्याच्या मार्गावर असून ट्रॅक्टर, पावर ट्रिलर, लोखंडी बंडीसारखे यंत्र निघाल्यामुळे सुताराचा लाकडी औजारे बनविण्याचा व्यवसाय बंद होत आहे.पूर्वीच्या काळी शेती अवजारे जास्तीत जास्त लाकडी रहायची आणि ती गावातीलच लोहार-सुताराकडून शेतकरी करून घ्यायचे. त्यात शेतकºयांचे मुख्य शेतीकरिता लागणारे वाहन म्हणजे लाकडी बैलगाडी, शेतकºयांची बैलगाडी तयार करण्याकरिता सुताराला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागायचा. बैलगाडीकरीता दोन सागवान किंवा तिवसाच्या झाडाचे धुरे, लाकडी तक्त्यांचा फळ, जुवाडी, खुटाडे, धुरी, मांडगे, हरणी, करवई, खोबन आणि त्यामध्ये लोखंडी आख. आखेमध्ये दोन चाके घालून लाकडी बैलगाडी करायची. बंडी तयार करण्यासाठी लोहाराला एक महिना मेहनत करावी लागत होती. मात्र, या मेहनतीसाठी लोहाराला शेतकºयांकडून चांगली मिळकत व्हायची.लोहार काम कमी झाल्याने आमच्या समाजावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे महागाईच्या दिवसात मुलांचे शिक्षण, घरचा खर्च चालवणे कठीण झाले आहे. शेतीचे नुकसान म्हणजे आमचा धंदा कमी, हे गणित असल्याने शेतकरी नुकसानभरपाईसोबत आमचाही विचार सरकारने करावा.- सतीश सोमवंशी, अध्यक्ष, वसई तालुका लोहार समाज