शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात 90 कोटींची दस्तनोंदणी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 02:46 IST

जिल्ह्यात केवळ मार्च महिन्यामध्ये सुमारे ९० कोटी म्हणजेच ८९ कोटी ४७ लाख ८२ हजार ९२४ एवढी रक्कम दस्त नोंदणीतून जमा झाली आहे.

- हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयामध्ये फ्लॅट, गाळे आदींची दस्त नोंदणीची सवलत ३१ मार्चपर्यंत देण्यात आली असली, तरी या कालावधीत दस्त नोंदणीचे शुल्क भरून पुढील चार महिने कधीही दस्त नोंदणी करता येणार असल्याची मुभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने या कार्यालयात फारशी गर्दी दिसून आली नाही. दरम्यान, जिल्ह्यात केवळ मार्च महिन्यामध्ये सुमारे ९० कोटी म्हणजेच ८९ कोटी ४७ लाख ८२ हजार ९२४ एवढी रक्कम दस्त नोंदणीतून जमा झाली आहे. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयात आपल्या फ्लॅट, व्यावसायिक गाळे आदींची दस्त नोंदणी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनावाढीला आमंत्रण मिळत असल्याने ग्रामीण व शहरी भागासाठी विशेष बाब म्हणून जिल्हा निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना ही सवलत देण्यात आली आहे. राज्य शासनामार्फत डिसेंबरपर्यंत दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सवलत घोषित केली होती. या सवलतीचा फायदा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घेतलेला आहे. तसेच जानेवारी ते मार्चअखेर मुद्रांक शुल्क कमी केले असून ३१ मार्चपर्यंत शहरी भागांमध्ये चार टक्के मुद्रांक शुल्क व नोंदणी फी अशी पाच टक्के इतकी आहे. ही सवलत ३१ मार्चपर्यंत देण्यात आली असली, तरी ३१ मार्चपर्यंत आपल्या दस्त कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये मोठी गर्दी होत असल्याचे लक्षात घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ तारखेपर्यंत ऑनलाइन अथवा इतर प्रकाराने दस्त नोंदणी शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत केव्हाही दस्त नोंदणी पक्षकारांना करता येणार असल्याची सवलत देण्यात आली असल्याचे नितीन पिंपळे यांनी कळविले होते. जिल्ह्यात पालघर, बोईसर, विक्रमगड, वसई भागांत एकूण १४ कार्यालये असून त्या अनुषंगाने बहुतांशी दस्त नोंदणीधारकांनी २७ मार्चआधीच आपल्या दस्त नोंदणीची कामे आटोपून घेतली होती. त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवारी धुळवडीची सुट्टी असली, तरी मंगळवारी पालघरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात फारशी गर्दी दिसून आली नव्हती.  दलालांचा सुळसुळाट?जिल्ह्यातील बहुतांश दुय्यम निबंधक कार्यालयांत दलालांचा सुळसुळाट झाला असून दस्त नोंदणी करतेवेळी या दलालांच्या हातात काही हजारांची रक्कम सोपविल्यानंतर तत्काळ नोंदणीचे काम होत आहे. मात्र, इतर काही दस्त नोंदणीधारकांना दोन-दोन दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी दुय्यम निबंधक कार्यालयांत नोंदणीसाठी आलेल्यांकडून होत आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :palgharपालघर