शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

हुतात्मा जंगलू ढोरे यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी

By admin | Updated: August 12, 2015 02:32 IST

१९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान ब्रिटिशांच्या गोळीबारात वीरमरण आलेले वा श्रमप्रतिष्ठा जपणारे वर्धेतील प्रथम

आॅगस्ट क्रांती दिन : १९४२ मध्ये छेडलेल्या चले जाव आंदोलनातील हुतात्म्यांना आदरांजलीवर्धा : १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान ब्रिटिशांच्या गोळीबारात वीरमरण आलेले वा श्रमप्रतिष्ठा जपणारे वर्धेतील प्रथम हुतात्मा जंगलू ढोरे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर यांनी व्यक्त केले.१०४२ रोजी ब्रिटिश सरकारला ‘चले जाव’ चा नारा देण्यात आला. या आंदोलनात हुतात्मा जंगलू धोंडबाजी ढोरे यांना ११ आॅगस्ट १९४२ रोजी विरमरण आले. या वर्धेतील प्रथम हुत्यात्माला संवेदना सामाजिक संस्थेच्या वतीने लक्ष्मी नारायण मंदिराच्या बाजूला असलेल्या स्मारकावर पुष्पचक्र ठेवून आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी किल्लेकर बोलत होते. ते म्हणाले, शहिदांचे बलिदान व्यर्थ ठरता कामा नये. यासाठी त्यांच्या स्मारकाची देखभाल करून ऐतिहासिक वारसा जनत करणे आपली नौतिक जबाबदारी आहे. तरच शहिदांचा आदर्श समाजापुढे राहील असे विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी स्मृतिस्थळ परिसरात अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मौन पाळून हुतात्म्यास श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला संवेदना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनीष जगताप, सचिव मनीष भटकर, हेमंत देशमुख, चंदू नवरे, जयंत ठाकरे, मुकुल भेंडे, संदीप घनोकार, पोलीस कॉन्स्टेबल किशोर ठाकरे, नितीन पठाडे, राजेश टाकळे, अक्षय बिजवार, मनीष हाडके, अमोल गोटे, धनंजय मेश्राम, पवन देवगडे, नामदेव मुंगल, वामन राऊत, प्रकाश इंदुरकर उपस्थित होते. प्रास्ताविक मनीष जगताप, संचालन अक्षय बिजवार तर आभार मनीष हाडके यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)४आष्टी(शहीद) - येथील श्री समर्थ महाविद्यालयाच्या रा.से.यो. विभागाद्वारे आॅगस्ट क्रांती दिन कारेयक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हेमंत खानझोडे तर प्रमुख अतिथी म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा.मोरेश्वर देशमुख उपस्थित होते. ४प्रा. देशमुख म्हणाले, स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील शेवटचा टप्पा म्हणून १९४२ च्या चले जाव आंदोलनाकडे पाहिले जाते. या आंदोलनाला संपूर्ण भारतीयांचे सहकार्य मिळाल्याने ही जनक्रांती होती असे ते म्हणाले.४प्राचार्य खानझोडे म्हणाले, अनेकांच्या त्याग व बलीदानातून प्राप्त झालेले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या सजग असणे आवश्यक आहे. विकृत विचार दूर सारून स्वातंत्र्याचे पे्ररणादायी मानचिन्ह जतन करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. क्रांतीदिनी शहीद झालेल्या हुतात्म्यांना यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या स्मृती सर्वांनी जपण्याचे आवाहनही करण्यात आले. ४ प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत जाधव यांनी केले. संचालन स्नेहल ठाकरे हिने केले. आभार प्रा. राजेश सवाई यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी) आधारवड परिवारातर्फे हुतात्म्यांना अभिवादन४वर्धा- अनेकांत स्वाध्याय मंदिरात आधारवड ज्येष्ठ नागरिक परिवारातर्फे आॅगस्ट क्रांतीदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेखर सोळके तसेच मुख्य अतिथी म्हणून अनिल फरसोले, प्रा. दत्तानंद इंगोले, आधारवड संस्थेचे अध्यक्ष श्यामकांत देशपांडे उपस्थित होते. अनिल फरसोले यावेळी म्हणाले, महात्मा गांधीजींच्या विचारांपासून दूर राहणे म्हणजे सर्वांगीण विकासापासून व पर्यावरण संरक्षणापासून दूर राहणे होय.’ सेवाग्राम आश्रम आणि महात्मा गांधी यांच्या ऋणानुबंधाविषयीही त्यांनी माहिती दिली. ४कार्यक्रमाला अ‍ॅड. मोहन देशमुख, न्यायमूर्ती नारायण भोयर, अ‍ॅड. वसंत घुडे, अ‍ॅड. अशोक वाघ, चंद्रकांत वखरे, गुणवंत डकरे, प्रल्हाद, गिरीपुजे, प्रमोद भोयर, मधुकर कलाने, अरूण महाबुधे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य शेख हाशम यांनी केले. यशस्वीतेकरिता सुभाष देशमुख, दिवाकर इंगळे व मनोज बडगईयां आदींनी सहकार्य केले.