वन्यजीव धोक्यात : शिकारीचे प्रमाण वाढलेआकोली : वनपाल, वनरक्षक व वनमजुरांनी गत सहा दिवसांपासून संपाचे हत्यार उगारले आहे. संपात वनपाल, वनरक्षकांसह वनमजूर सुद्धा उतरले आहे. जिल्ह्यातील जवळपास ३८१ कर्मचारी संपावर गेल्यामुळे वन्य प्राण्यांच्या शिकारीची शक्यता वाढली आहे. संपावर कोणताही सन्मानजनक तोडगा निघाला नसल्याने व संप चिघळला तर वनसंपदा धोक्यात येणार आहे.वेतन वाढीच्या मागणीसाठी जिल्ह्यातील १९३ वनस्थळ, ३८ वनपाल व १५० वनमजूर संपात सहभागी झाले आहे. रक्षक संपावर गेल्याने शिकारी व सागवान आणि गौण खनिज तस्कर संपाचा गैरफायदा घेत वनांवर डल्ला मारत असल्याचे चित्र आहे. हिंगणी वनपरिक्षेत्रातील बराचसा भाग वाईल्ड लाईफमध्ये गेला असून जंगलात वाघाचे अस्तीत्व आहे. अशावेळी वाईल्ड लाईफ क्षेत्रात जनावरे चराईला सोडल्या जात असल्याने गुराखी व गुरांचा जीव धोक्यात आला आहे. शिकारदारांना आता ऊत आला असून हरिण, मोर व रानडुकरांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसरात्र जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतांना वेळप्रसंगी जीव धोक्यात घालणाऱ्या वनपाल, वनरक्षक व वनमजुरांना मिळणारे वेतन पोलीस कर्मचाऱ्यापेक्षा सुद्धा कमी आहे. राज्याच्या तिजोरीत भर पाडणारे वनकर्मचारी वेतनाचा मुद्दा पुढे करतात तेव्हा प्रत्येक वेळी शासन आडमुठे धोरण राबविते अशी भावना वनकर्मचाऱ्यांनी बोलून दाखविली आहे. संपाचा सहावा दिवस उलटूनही कोणताही समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे वनांतल समस्या वाढत आहेत.(वार्ताहर)
वनपाल, वनरक्षकांचा संप चिघळला
By admin | Updated: September 1, 2014 00:09 IST