शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सरायला ‘राज्य संरक्षित स्मारका’ची प्रतीक्षा

By admin | Updated: January 22, 2015 02:00 IST

संतांच्या भूमीचा वारसा लाभलेला महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. शिवाजी महाराज, संभाजी राजे, पेशवे, भोसले यासारखे शूरविर इतिहासाची साक्ष देतात.

देवकांत चिचाटे नाचणगावसंतांच्या भूमीचा वारसा लाभलेला महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. शिवाजी महाराज, संभाजी राजे, पेशवे, भोसले यासारखे शूरविर इतिहासाची साक्ष देतात. राज्यातील विविध जिल्ह्यातील किल्ले, गड, मंदिर, वाडे आजही याची साक्ष देतात. काळाच्या ओघात अशा ऐतिहासिक वास्तूची पडझड होऊ नये तसेच त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी अशा वास्तुंना राज्य संरक्षित स्मारक घोषित करून त्यांचे जतन व संरक्षण करण्याचे काम राज्य शासन करते. शासनाच्या पुरातत्व विभागामार्फत या राज्य संरक्षित वास्तुची जोपासना केली जाते; पण येथील भोसलेकालीन इतिहासाची साक्ष देणारी सराय अद्यापही उपेक्षित आहे़ सरायचे राज्य संरक्षित वास्तु घोषित करून जतन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे़ काय आहे राज्य संरक्षित वास्तूशासनाकडून ऐतिहासिक वास्तुचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केल्यानंतर त्या वास्तुला राज्य संरक्षित वास्तु म्हणून घोषित केले जाते. राज्य पुरातन विभागाकडून अशा वास्तुचे जतन व संवर्धन करण्यात येते. स्मारक, किल्ले, मंदिर यांचा त्यावेळच्या इतिहासावर झालेला परिणाम, वास्तुच्या सध्याच्या स्थितीचा विचार करून तसेच मूळ स्थापत्य कला लक्षात घेऊन ऐतिहासिक वास्तु अधिकाधिक काळ कशी टिकेल, मूळ कलेलाही धक्का पोहोचणार नाही, या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर सदर वास्तु राज्य संरक्षित वास्तु म्हणून घोषित केली जाते़जतन-संवर्धन काय आहे?शासनाच्यावतीने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेल्या वास्तुचे पुरातत्व विभागाकडून जतन, संवर्धन करताना मूळ स्थापत्य टिकविण्याकडे लक्ष असते़जीर्ण होत असलेले वाडे, स्मारक, किल्ले आदींचा त्याकाळच्या इतिहासातील महत्त्व व आजचा त्यावर झालेला परिणाम, याचाही विचार करण्यात येतो. संरक्षित वास्तूच्या देखभाल व दुरस्तीची जबाबदारी पुरातत्त्व विभागाद्वारे स्वीकारली जाते. वास्तुचा एखादा भाग कोरला असला तर तो दुरूस्त करताना ती दुरूस्ती मूळ बांधकामानुसार करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो़ यातून वास्तूचे सौंदर्य अबाधित राखण्याचे प्रयत्न केले जातात़पुरातत्त्व विभागाची उदासीनतानाचणगाव येथील सराय ही भोसलेकालीन इतिहासाची साक्ष देणारा ऐतिहासिक ठेवा आहे़ ही सराय गत कित्येक वर्षांपासून राज्य संरक्षित वास्तु घोषित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. तत्कालीन सरपंच हरिभाऊ साठे, शंकर राऊत, जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल यांनी सराय राज्य संरक्षित वास्तु व्हावी म्हणून सांस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा केला; पण संबधित विभागाच्या उदासिनतेमुळे ते होऊ शकले नाही़ पुरातत्व विभाग हा सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येत असल्याने यासाठी शासनस्तरावर प्रयत्न हाणे गरजेचे झाले आहे़