शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

वन्यप्राण्यांना बसणार ‘आवाजाचा’ चाप

By admin | Updated: March 27, 2017 01:08 IST

शेतकरी कायम संकटांनी घेरलेला असतो. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी वन्यप्राण्यांचा उपद्रव होतो.

बा.दे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग : सौर उर्जेवरील कुंपण आणि ध्वनी लहरी विस्करण यंत्रवर्धा : शेतकरी कायम संकटांनी घेरलेला असतो. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी वन्यप्राण्यांचा उपद्रव होतो. वन्यप्राण्यांच्या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्ती व्हावी म्हणून बा.दे. अभियांत्रिकी महा.च्या इलेक्ट्रॉनिक शाखेतील विद्यार्थ्यांनी एक यंत्र विकसित केले आहे. सौर उर्जा वापरून ‘सौर ऊर्जा कुंपण’ व ‘ध्वनी लहरी विस्करण’ असे यंत्राचे नाव आहे. यातील ध्वनी कंपनामुळे वन्य प्राणी, पक्षी शेतातील पिकांकडे फिरकणार नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.वन्यप्राणी, पक्षी शेतात येऊ नये, म्हणून शेतकरी विविध उपाय करतात. बुजगावणे उभे करणे, शेताच्या धुऱ्याला विविध रंगांचे कापड लावणे आदी केले जाते; पण वन्यप्राण्यांच्या त्रासापासून सुटका होत नाही. याचा अभ्यास करून वन्यप्राण्यांना आळा बसावा सेवाग्राम येथील बा.दे. अभियांत्रिकी महा.च्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील निलेश ठाकरे, स्वप्नील कुरेकर, श्रुती पुण्यप्रेड्डीवार, सरिता कुमारी या विद्यार्थ्यांनी सौर उर्जेचा वापर करून सौर ऊर्जा कुंपण व ध्वनी लहरी विस्करण यंत्र विकसित केले. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने रात्रीतून पीक नष्ट होते. यावर उपाय करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांशी चर्चा करून अभ्यास सुरू केला. वन्यप्राणी व पक्ष्यांना इजा होणार नाही व ते शेतात येणार नाही, असे ध्वनीकंपन यंत्र विकसित करण्याचे ठरले. विविध बाबींचा अभ्यास करून आवाजाची तिव्रता लक्षात घेतल्याचे मार्गदर्शक प्रा. निखील बोबडे यांनी सांगितले.एक एकर परिसर या यंत्राच्या अधिपत्यात येणार आहे. शेताच्या मध्यभागी हे यंत्र लावले येईल. सौरऊर्जेचा उपयोग केल्याने विजेची बचत होईल. रात्री ७ ते ८ तास चालेल एवढा बॅटरी बॅकअप राहणार असून यंत्रातून निघणाऱ्या अल्ट्रा साऊंडमुळे कोणताही प्राणी शेतात फिरकू शकणार नाही. ध्वनीकंपनाने एखादा प्राणी जुमानला नाही आणि शेतापर्यंत पोहोचलाच तर कुंपणाला स्पर्श होताच दूर फेकला जाईल. यासाठी ४ हजार वॅटचा डिसी सप्लाय देण्यात आला आहे. यामुळे प्राण्यांना इजा होणार नाही. केवळ प्राणी दूर होईल, अशी व्यवस्था यंत्रामध्ये करण्यात आली आहे. यातून प्राण्यांचे रक्षण ही बाबही लक्षात घेण्यात आली आहे. कुंपण तोडण्याचा प्रयत्न केल्यास सायरण तर वजेलच; पण याबाबत संदेश शेत मालकाला भ्रमणध्वनीवर मिळेल. यासाठी जीआरपीएस सिस्टम वापरले आहे. शेतकऱ्यांसाठी लाभदायक असे या यंत्राचे प्रात्यक्षिक शेतात घेण्यात आले असून ते यशस्वी झाल्याचे निलेश ठाकरे याने सांगितले. संचालक समीर देशमुख, प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या शेतीपयोगी यंत्राचे कौतुक करीत तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचवून शेतीक्षेत्र प्रगत करण्याचा चांगला प्रयत्न असल्याचे सांगितले. यात विभागप्रमुख डॉ. दांडेकर, डॉ. इंगळे, प्रा. वझुरकर यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)२० किलो हर्टस् आवाजाने व्यक्ती होतो अस्वस्थसाधारणत: २० किलो हर्टस आवाजाने व्यक्ती बैचेन होतो. त्याला अस्वस्थता वाटू लागते आणि तो आवाज कधी बंद होतो, असे वाटायला लागले. प्राण्यांची आवाजाची क्षमता माणसांपेक्षा अधिक दिसून आली. माकड ५० किलो हर्टस, ससा ४२, रानडुक्कर ५०, गाय ३५, शेळी ३० फुलपाखरू ६ तर पक्षी ७.५ हर्टस आवाजाने दूर पळत असल्याचे निदर्शनास आले. याच आधारावर हे ध्वनीकंपन यंत्र विकसित करण्यासत आले आहे. या यंत्रामध्ये सायरन लावण्यात आले असून बॅटरी आणि सौरऊर्जा यंत्र बसविण्यात आले आहे. हे यंत्र रात्री सात ते आठ तास चालू शकेल एवढा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. सुरगावचे शेतकरी राजेंद्र वानखेडे यांनी हे यंत्र उपयोगी असून निश्चितपणे याचा फायदा होईल, असे सांगितले.