शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला इकडे येण्याची संधी, विचार करता येईल, विधिमंडळातच फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
7
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
8
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
9
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
10
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
11
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
12
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
13
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
14
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
15
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
16
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
17
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
18
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
19
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
20
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल

कृषी विभाग देणार शेतकर्‍यांना गावोगावी संदेश

By admin | Updated: May 20, 2014 23:49 IST

राज्यातील खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम नैसर्गिक प्रकोपाच्या दुष्टचक्रात सापडले़ यामुळे शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागले़ येत्या हंगामात तसे होऊ नये म्हणून शेतकर्‍यांना गावोगावी संदेश

सुरेंद्र डाफ - आर्वी

राज्यातील खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम नैसर्गिक प्रकोपाच्या दुष्टचक्रात सापडले़ यामुळे शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागले़ येत्या हंगामात तसे होऊ नये म्हणून शेतकर्‍यांना गावोगावी संदेश पोहोचविले जाणार आहेत़ यासाठी कृषी विभागाने विशेष योजना हाती घेतली आहे़ यात सोयाबीन बियाण्यांबाबत शेतकर्‍यांना माहिती दिली जाणार आहे़ खरीप हंगामात विदर्भातील सोयाबीन हे पीक सध्या महत्त्वाचे मानले जात आहे़ शेतकर्‍यांना शुद्ध व उत्पादीत सोयाबीन बियाणे मिळावे यासाठी राज्याच्या कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत़ बोगस बियाण्यांना व नियंत्रण ठेवण्यासाठी पथके निर्माण केली आहेत़ शेतकर्‍यांना आपल्याच शेतातील सोयाबीनची उगवणशक्ती तपासून पेरणी करण्यासाठी ग्रामीण भागातील गावोगावी संदेश कृषी विभागाद्वारे देण्यात येणार आहे़ राज्यातील शेतकर्‍यांचे खरीप व रब्बी, हे दोन्ही हंगाम व्यर्थ ठरले़ अतिवृष्टी व पावसाच्या फटक्याने तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीनला कोंब आले़ अनेकांचे सोयाबीनचे पीक पाण्याने खराब झाले़ यामुळे नुकसान सोसावे लागले़ अनेकांना झालेला खर्चही भरून काढता आला नाही़ प्रारंभी सोयाबीनला ३०० ते ३०६० पर्यंत भाव मिळाले़ मार्च अखेरपर्यंत ही भाववाढ न झाल्याने शेतकर्‍यांनी शेतातील सोयाबीन बाजारपेठेत विकले़ राज्यात सर्वत्र सोयाबीनला नैसर्गिक आपत्तीने झोडपले असताना निकोप, उत्कृष्ट व उपजावू शक्ती असलेले सोयाबीन बियाणे मिळणार काय, हा प्रश्नच आहे़ शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पेरणीसाठी राखूव ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाद्वारे केले जात आहे; पण शेतकर्‍यांकडे पेरणीयोग्य सोयाबीन नसल्याने तुटवडा भासण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ सोयाबीन बियाण्यांच्या भासणार्‍या तुटवड्याबाबत कृषी विभागाने बैठकी घेऊन खासगी व शासकीय कंपन्यांची बैठक घेतली़ यात सोयाबीन पिकाच्या बियाण्यांवर उपाययोजना करण्यासाठी अधिकाधिक शेतकर्‍यांना निकोप व उत्पादन देणारे तसेच उगवण शक्ती असलेले बियाणे देण्याबाबत उपाययोजना करणे सुरू आहे़ राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा बघता काही बोगस बियाण्यांची विक्री कृषी केंद्रामार्फत केले जाण्याची शक्यता आहे़ यामुळे उपाययोजना म्हणून ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन बियाणे राखून ठेवले, त्यांनी त्या बियाण्यांची उगवण शक्ती तपासून लागवड करावी, असे संदेश दिले जाणार आहेत़ यासाठी गुणनियंत्रण पथक, तालुका जि़प़, पं़स स्तरावर नेमण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे़