पराग मगर वर्धासाठ वर्षांचे परसराम उईकार बोलायला तसे अघळपघळ. २५ वर्षांपासून ते आरती टॉकीज परिसरात चपला, बूट शिवण्याचा व्यवसाय करतात. चपला आल्या की शिवायच्या नाहीतर निवांत झोप काढायची हा त्यांचा दिनक्रम. हिंदी मराठी असं मिक्स भाषेत बोलण ही त्यांची खासियत. वय होत चाललय पण शेवटपर्यंत स्वावलंबी राहण्याचा त्यांचा आत्मविश्वास तरुणांनाही लाजवेल असाच आहे. आरती चौक या वर्दळीच्या चौकात परसराम उन्ह, वारा पावसात चपला बुटं शिवण्याचे काम करतात. समजायला लागलं तेव्हापासूनच ते चपला शिवत असल्याचे सांगतात. आधी गोपुरी येथील चर्मालयात चपला बनविन्याचे काम ते करायचे. पण चर्मालय बंद पडले. त्यामुळे काय करावे, कुटुंबाला कसे पोसावे हा प्रश्न होतात. चपला बनविणे व शिवणे एकढच माहिती होतं. त्याच भरवशावर आरती चौकात त्यांनी कापड बांधून तात्पुरते दुकान सुरू केले. तेव्हा लोक चपला पुरवून पुरवून वापरायचे. त्यामुळे चपला शिवायलाही पुष्कळ जण यायचे. उन्हाळा व हिवाळा तर कसाबसा निधून जायचा; पण पावसाळ्यात मात्र खूप कसरत व्हायची. तरीही दिवसं काढले. काहीच वर्षापूर्वी पंचायत समितीमध्ये चर्मालय ग्रामोद्योगासाठी मिळत असलेल्या लोखंडी शेडसाठी अर्ज केला. त्याला वर्ष लागले. पण मिळाले यात धन्यता. शासनाने कर्ज उपलब्ध करुन द्यावेआतापर्यंत मेहनत करूनच पोट भरलं. कुणापुढे कधी हात पसरले नाही. त्यामुळे शासनाने मदत दिलीच तर आपल्याला कर्ज द्यावं एवढीच माफक अपेक्षा असल्याचे उईकार सांगतात. त्या पैशातून जास्त माल आणता येईल. दुकान वाढविता येईल.अजून २५ वर्ष काम करायचंयपरसराम यांच वय आज ६० वर्षांच्यावर आहे. पण आपल्याला अजून २५ वर्ष काम करायच आहे, असे ते विश्वासाने सांगतात. दोन मुलं आहेत. ते ही आपापल्या व्यवसायात आहेत. पण त्यांच्याकडून आपल्या कुठल्याही अपेक्षा नाही. आपण स्वत:च पोट भरण्यासाठी सक्षम असल्याचं ते सांगतात.आता लोकांना चपलींचे महत्त्व वाटत नाहीआधी लोक एकच चप्पल पुरवून पुरवून वापरायचे. फाटली किंवा तुटली तरी शक्य तितकी शिऊन वापरायचे; पण आता मात्र लोक एक नाही दहा चपला घालतात. तरही चपला शिऊन घालणारेही असतात. अशांवरच आमचा व्यवसाय चालत असल्याचे परसराम सांगतात.
शेवटपर्यंत स्वावलंबीच राहणार
By admin | Updated: February 22, 2015 01:52 IST