प्रफूल्ल काळे : लॉयनेस क्लबचा उपक्रमवर्धा : बांबू वर्क, खादी बॅग, वस्तर कलाकृती, लाकडापासून तयार होणाऱ्या कलाकृती अशा अनेक साहित्यांचे प्रशिक्षण नागरिकांना द्यावे, असे आवाहन करीत महात्मा गांधी ग्रामीण ओद्योगिकीकरण संस्थानचे संचालक प्रफुल्ल काळे यांनी एमगीरीमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंची माहिती दिली़ महात्मा गांधी यांच्या पावन भूमीत महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था ७० वर्षांपासून कार्यरत आहे. शहरातील मुख्य मार्गावर चालणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन एमगीरीचे संचालक प्रफुल्ल काळे यांच्या हस्ते करण्यात आले़ एमगीरीमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंचे लोकसभेमध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूंची माहिती दिली़ शिवाय अमेरीकन डायमंड ज्वेलरी, अॅन्टीक ज्वेलरी, राखी आदी वस्तुंची प्रदर्शनी लावण्यात आली. यावेळी लॉयन्सचे अध्यक्ष प्रशांत पांडे यांच्या हस्ते प्रफुल्ल काळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला़ लॉयनेसच्या अध्यक्ष सोनाली श्रावणे व सचिव रितुराज चुडिवाले यांनीही काळे यांचा सत्कार केला़ या उपक्रमाचे संचालन अभिषेक बेद व आस्था बेद यांनी केले. कार्यक्रमाला लॉयन्सचे अभिजीत श्रावणे, नितीन रोकडे, वरुण फत्तेपुरीया, नौशाद बक्श, पेरश शर्मा, योगीता मानकर, स्मीता बढिये, सपना बेद, डॉ. गोडे, डॉ. बनाईत, बाळासाहेब इंगोले, प्रदीप दाते आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
कलाकृती साहित्याचे प्रशिक्षण द्यावे
By admin | Updated: August 1, 2014 00:25 IST